हार्ले-डेव्हिडसन रस्त्यावरून निघाल्यावर लोक केवळ तिच्या लुकमुळे नाही, तर तिच्या सायलेन्सरमधून येणाऱ्या ‘फट फट फट’ अशा धडधडणाऱ्या लेजंडरी आवाजामुळे वळून बघतात. हा केवळ आवाज नाही, तर जगभरातील रायडर्ससाठी एक ‘इमोशन’ आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, ९० च्या दशकात हार्लेने या अनोख्या आवाजावर स्वतःची मक्तेदारी मिळवण्यासाठी त्याची चक्क कायदेशीर कोंडी करण्याचा आणि त्याचे ‘पेटंट’ घेण्याचा प्रयत्न केला होता?
इंजिनची रचना आणि लेजंडरी आवाजाचा जन्म
हार्लेचा हा आवाज कोणत्याही कृत्रिम सायलेन्सरमुळे येत नाही, तर तो त्यांच्या आयकॉनिक ‘V-Twin’ इंजिनच्या खास रचनेमुळे येतो. या इंजिनमध्ये दोन्ही पिस्टन एकाच ४५-डिग्री कोनात एकाच पिनला जोडलेले असतात. यामुळे इंजिन सुरू असताना पिस्टनच्या हालचालीत एक ठराविक असमान अंतर तयार होते. या गॅपमुळेच तो जगप्रसिद्ध ‘रिदम’ किंवा ठेका तयार होतो, जो ऐकायला एखाद्या संगीतासारखा वाटतो.
गाड्यांमध्ये येतोय ‘सायलेंट हॉर्न’! फक्त गाडी समोरच्या पादचाऱ्याला जाणार आवाज ऐकू!
६ वर्षांची ऐतिहासिक कायदेशीर लढाई
१९९४ मध्ये हार्ले-डेव्हिडसन कंपनीने अमेरिकेत एक अत्यंत धक्कादायक ट्रेडमार्क अर्ज दाखल केला. त्यांचे म्हणणे होते की, “आमच्या इंजिनचा हा विशिष्ट, धडधडणारा आवाज ही आमची ब्रँड ओळख आहे, त्यामुळे इतर कोणत्याही ब्रँडला अशा आवाजाच्या बाईक्स बनवण्याची परवानगी नसावी.”
हा अर्ज दाखल होताच ऑटोमोबाईल जगतात मोठी खळबळ माजली. होंडा, सुझुकी, यामाहा आणि कावासाकी यांसारख्या दिग्गज जपानी कंपन्यांनी एकत्र येऊन याविरुद्ध एकजूट केली आणि हार्लेवर कायदेशीर हल्ला चढवला. त्यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, ४५-डिग्रीचे व्ही-ट्विन इंजिन वापरणाऱ्या कोणत्याही क्रूझर बाईकचा आवाज असाच येऊ शकतो. हा विज्ञानाचा आणि इंजिनच्या रचनेचा नैसर्गिक परिणाम आहे, त्यामुळे एकाच कंपनीला निसर्गाच्या नियमांचे पेटंट देणे चुकीचे ठरेल.
BMW च्या लोगोमागील हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? त्वरीत जाणून घ्या
शेवटी काय झाले?
ही कायदेशीर लढाई कोर्टात तब्बल ६ वर्षे चालली. जगभरातील प्रतिस्पर्धी कंपन्यांचा वाढता विरोध आणि कायदेशीर गुंतागुंत पाहता, शेवटी वर्ष २००० मध्ये हार्ले-डेव्हिडसनने स्वतःहून आपला हा अर्ज मागे घेतला.
जरी हार्लेला या आवाजाचे अधिकृत कायदेशीर पेटंट मिळवता आले नसले, तरी या प्रकरणाने या आवाजाला आणखी जास्त लोकप्रिय केले. आज २६ वर्षांनंतरही जगभरातील बाईक प्रेमींच्या मनात या ‘फट फट फट’ आवाजाचे अनऑफिशल पेटंट फक्त आणि फक्त हार्ले-डेव्हिडसनकडेच कायम आहे






