Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा

सप्टेंबरमध्ये किआ इंडियाने 32,017 वाहनांची विक्री करत आतापर्यंतचा सर्वात मोठा मासिक सेल्स रेकॉर्ड केला. पण विशेष म्हणजे कंपनीच्या विक्रीत 41% वाढ झाली असून CNG, EV आणि हायब्रिड मॉडेल्सचा विस्तारही वेगाने सुरू आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 02, 2026 | 03:30 PM
सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा
Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबर 2026 मध्ये किआ इंडियाने आतापर्यंतची सर्वाधिक 32,017 वाहनांची मासिक विक्री नोंदवली.
  • किआच्या सप्टेंबर विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 41 टक्क्यांची वाढ झाली.
  • CNG, EV आणि हायब्रिड मॉडेल्समुळे किआच्या भारतीय पोर्टफोलिओचा विस्तार वेगाने होत आहे.
Kia India ने भारतीय कार मार्केटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. सप्टेंबर 2026 मध्ये कंपनीने तब्बल 32,017 वाहनांची विक्री केली. भारतात एंट्री केल्यानंतरची ही कियाची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री ठरली आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने 22,700 युनिट्स विकल्या होत्या. त्यामुळे यंदा विक्रीत तब्बल 41% वाढ झाली आहे.

ऑगस्टच्या तुलनेतही विक्री वाढली

कियाच्या धडाकेदार कामगिरीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे सप्टेंबरमध्ये कंपनीची विक्री केवळ वार्षिक आधारावरच नाही, तर महिन्याच्या तुलनेतही वाढली. ऑगस्ट 2026 मध्ये कियाने 29,042 युनिट्सची विक्री केली होती. त्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 10.2% वाढ नोंदवण्यात आली. म्हणजेच एका महिन्यात कंपनीने जवळपास 3,000 जास्त वाहनांची विक्री केली.

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

सेल्टोस आणि सोनेट ठरले महत्त्वाचे मॉडेल्स

कियाच्या एकूण विक्रीमध्ये सेल्टोस आणि सोनेटचा मोठा वाटा आहे. जानेवारीमध्ये लाँच झाल्यापासून सेल्टोसची सरासरी मासिक विक्री 10,000 युनिट्सपेक्षा जास्त राहिली आहे. दुसरीकडे सोनेट सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या दोन्ही SUVमुळे कियाला भारतीय मार्केटमध्ये मजबूत व्हॉल्यूम मिळत आहे.

9 महिन्यांत 2.53 लाखांहून जास्त वाहनांची विक्री

जुलै ते सप्टेंबर 2026 या Q3 कालावधीत कियाने 89,259 युनिट्सची विक्री केली. मागच्या वर्षी याच कालावधीत 64,443 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. तसेच जानेवारी ते सप्टेंबर 2026 दरम्यान कंपनीची एकूण विक्री 2,53,008 युनिट्सवर पोहोचली असून, मागच्या वर्षीच्या 2,06,582 युनिट्सच्या तुलनेत 22.5% वाढ झाली आहे.

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु

CNG, EV आणि हायब्रिडवरही फोकस

किया आपल्या मॉडेल लाइनअपमध्ये सातत्याने नवीन ऑप्शन जोडत आहे. कॅरेन्स, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस EVसोबत आता कॅरेन्स CNG आणि कॅरेन्स क्लॅव्हिस CNG देखील अव्हेलेबल आहेत. सायरोस EVलाही मागणी मिळत आहे. पेट्रोल, डिझेल, CNG, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक अशा वेगवेगळ्या पॉवरट्रेनसह किया आपले पोर्टफोलिओ मोठा करत आहे.

सोरेन्टोमुळे प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये विस्तार

नुकत्याच लाँच झालेल्या सोरेन्टोला देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतात ही SUV डिझेल आणि हायब्रिड पॉवरट्रेनसह येते. त्यामुळे किआचा प्रीमियम SUV सेगमेंटमधील सहभाग आणखी मजबूत झाला आहे. सप्टेंबरची 32,017 युनिट्सची विक्री आता कंपनीसाठी नवीन मासिक सेल्स बेंचमार्क ठरली आहे.

Web Title: Kia india record september sales 2026 seltos sonet auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

सप्टेंबरमध्ये निसानच्या गाड्यांची विक्री दुप्पट! रेनॉल्टच्या 3,399 युनिट्सची विक्री
1

सप्टेंबरमध्ये निसानच्या गाड्यांची विक्री दुप्पट! रेनॉल्टच्या 3,399 युनिट्सची विक्री

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!
2

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!

Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री
3

Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री

एप्रिलिया SXR GT 175 आणि SXR GT 125 भारतात लाँचसाठी सज्ज; बुकिंग सुरू
4

एप्रिलिया SXR GT 175 आणि SXR GT 125 भारतात लाँचसाठी सज्ज; बुकिंग सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.