
फोटो सौजन्य: Pinterest
भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या किआने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Kia Sonet ची विक्री केली आहे. या एसयूव्हीने अलीकडेच विक्रीचा एक नवीन टप्पा गाठला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
किआ कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Kia Sonet एसयूव्ही देखील देते. अलीकडेच, कंपनीने जाहीर केले की या एसयूव्हीचे तब्बल 5 लाख युनिट्स विकले गेले आहेत.
फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI
किआ इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी सनहॅक पार्क यांनी सांगितले की, सोनेटने ५ लाख विक्रीचा टप्पा पार करणे हा किआ इंडिया परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. विकली गेलेली प्रत्येक सोनेट म्हणजे किआवर विश्वास ठेवणारा एक ग्राहक आहे आणि भारतीय ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा हा ठोस पुरावा आहे. या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आमच्या सर्व ग्राहकांचे आम्ही मनापासून आभार मानतो.
कंपनीकडून या एसयूव्हीमध्ये एलईडी लाईट्स, ड्युअल-टोन एक्सटेरिअर, 16 इंच अलॉय व्हील्स, 10.25 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, बोस ऑडिओ सिस्टम, समोर व्हेंटिलेटेड सीट्स, 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, मागील एसी व्हेंट्स आणि ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलसारखे अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
ग्राहकांची ‘या’ कारवरून नजरच हटेना! 28 किमी मायलेज, ॲडव्हान्स फीचर्स आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी
किआ सोनेटमध्ये 1.2-लिटर स्मार्टस्ट्रीम, 1.2-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिन आहे. ही एसयूव्ही विविध ट्रान्समिशन पर्याय देते, ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड आयएमटी, 7-स्पीड डीसीटी, 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक यांचा समावेश आहे.
किआने ऑफर केलेल्या सोनेटची किंमत 7.30 लाख (एक्स-शोरूम) आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 14 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.