फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातही सर्वात जास्त डिमांड ही बजेट फ्रेंडली बाईकला जास्त असते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये स्वस्तात मस्त अशा बाईक ऑफर करत असतात. मात्र, उत्तम बाईक कोणती? हा प्रश्न नेहमीच ग्राहकांना भिडसावत असतो.
जर तुम्ही दररोज ऑफिसला जाण्यासाठी एक कमी किंमतीची, जास्त मायलेज देणारी बाईक शोधत असाल, तर TVS Sport ही एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते. ही बाईक भारतीय बाजारात किफायतशीर दरात उपलब्ध असून तिची रचना विशेषतः डेली कम्युटरसाठी करण्यात आली आहे. उत्तम मायलेज, कमी मेंटेनन्स आणि विश्वासार्ह ब्रँड यामुळे ही बाईक दररोजच्या वापरासाठी परिपूर्ण आहे. चला या बाईकच्या ऑन-रोड किंमत, ईएमआय आणि डाउन पेमेंटबद्दल जाणून घेऊयात.
टीव्हीएस स्पोर्ट बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये त्याच्या बेस व्हेरिएंट स्पोर्ट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हीलची ऑन-रोड किंमत सुमारे 72 हजार रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंट स्पोर्ट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हीलची ऑन-रोड किंमत सुमारे 86 हजार रुपये आहे.
आता Fastag च्या साहाय्याने होणार इंश्युरन्स आणि EV चार्जिंगचे पेमेंट, MoRTH बनवतंय भन्नाट प्लॅन
जर तुम्ही नवी दिल्लीमध्ये 10 हजार रुपयांचे डाउन पेमेंट देऊन बेस व्हेरिएंट खरेदी केले तर तुम्हाला यासाठी 62 हजार रुपयांचे लोन घ्यावे लागेल. तुम्हाला हे लोन 9.7 टक्के व्याजदराने मिळेल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तुम्हाला 3 वर्षांसाठी दरमहा 2 हजार रुपये EMI भरावा लागेल. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की लोन आणि व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो.
Toyota Innova Hycross ची झाली Crash Test, B NCAP कडून मिळाली ‘एवढी’ रेटिंग
कंपनीचा दावा आहे की TVS Sport बाईक प्रति लिटर 70 किमी पेक्षा जास्त मायलेज देते. यात टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक अॅब्झॉर्बर आहे. या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास पेक्षा जास्त आहे. बाजारात ही बाईक Hero HF 100, Honda CD 110 Dream आणि Bajaj CT 110X शी स्पर्धा करते. Hero HF 100 मध्ये 97.6 सीसी इंजिन आहे, जे कंपनीने अपडेट केले आहे.