फोटो सौजन्य: @AarizRizvi (X.com)
भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर केल्या जातात. यातही विशेषकरून ज्यांची जॉईंट फॅमिली असते त्यांचा 7 सीटर कार खरेदी करण्यावर जास्त जोर असतो. मार्केटमध्ये अनेक 7 सीटर कार उपलब्ध आहेत. Toyota Innova ही त्यातीलच एक.
टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Toyota Innova ही त्यातीलच एक उत्तम आणि लोकप्रिय कार आहे. या कारचा Hycross व्हेरिएंटला देखील मार्केटमध्ये चांगली मागणी मिळत आहे.
कंपनी MPV सेगमेंटमध्ये टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ऑफर करते. नुकतेच या कंपनीच्या MPV ची क्रॅश टेस्ट करण्यात आली आहे. त्यानंतर, B NCAP ने या कारला किती रेटिंग दिले आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Kia Carens Clavis EV होऊ शकते देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर Electric MPV, केव्हा होणार लाँच?
बी एनसीएपीने केलेल्या क्रॅश टेस्टनंतर, टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला सेफ्टीसाठी पूर्ण पाच स्टार देण्यात आले आहेत. प्रौढ तसेच मुलांच्या सुरक्षिततेसाठी या कारला पूर्ण गुण मिळाले आहेत. म्हणजेच ही कार सुरक्षिततेच्या परीक्षेत पूर्णपणे पास झाली आहे.
भारत एनसीएपीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या टोयोटा एमपीव्हीला प्रौढांच्या सुरक्षेत 32 पैकी 30.47 गुण मिळाले आहेत. त्याच वेळी, मुलांच्या सुरक्षेत 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. वेबसाइटनुसार, ही टेस्ट एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आली होती आणि आता त्याचे निकाल पब्लिश करण्यात आले आहेत.
वेबसाइटनुसार, MPV ची क्रॅश टेस्ट अनेक टप्प्यात करण्यात आली आहे. प्रौढांसाठी फ्रंटल ऑफसेट, साइड मूव्हेबल, साइड पोल इम्पॅक्ट टेस्ट घेण्यात आल्या आहेत. मुलांसाठी CRS इंस्टॉलेशन आणि व्हेईकल असेसमेंट टेस्ट घेण्यात आल्या आहेत.
1 लाखाचं डाउन पेमेंट आणि Kia Sonet ची चावी असेल तुमच्या हातात ! समजून घ्या EMI चा हिशोब
बी एनसीएपीच्या वेबसाइटनुसार, हे रेटिंग टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या तीन व्हेरिएंटसाठी वैध असणार आहे. हे रेटिंग या एमपीव्हीच्या आठ-सीटर व्हेरिएंटसाठी तसेच VX8S SHEV आणि ZX7S SHEV व्हेरिएंटसाठी वैध असेल.
या MPV मध्ये कंपनीकडून अनेक उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यात ADAS, 6 एअरबॅग्ज, VSC, हिल स्टार्ट असिस्ट, पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर, SOS ई-कॉल, ऑटो होल्डसह EPB, ABS, EBD, ISOFIX चाइल्ड अँकरेज, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा अशी सेफ्टी फीचर्स आहेत.
टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉस MPV ची एक्स-शोरूम किंमत 19.09 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 31.34 लाख रुपये आहे.