फोटो सौजन्य: iStock
पूर्वी टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागायच्या, ज्यामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाया जायचा. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग प्रणाली सुरू केली. यामध्ये वाहनचालकांचे पैसे थेट ऑनलाईन कापले जात असल्याने टोल वसुली जलद झाली आणि वेळेची बचत होऊ लागली. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे वाहनचालकांना वर्षभरासाठी निश्चित रक्कम भरून टोलमधून मोकळीक मिळणार आहे.
भारतात, सध्या राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर टोल कर भरण्यासाठी फास्टॅगचा वापर केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच FASTag पेमेंट एक्सपेंशन सुरू करण्याची तयारी करत आहे. त्याच्या लाँचनंतर सामान्य लोकांना कसा फायदा होऊ शकतो? त्याबद्दल जाणून घेऊयात.
Tata Harrier EV चा Stealth Edition लाँच, दमदार फीचर्ससह मिळणार जबरदस्त रेंज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात फास्टॅगमध्ये एक नवीन टप्पा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर लोकांना एकाच फास्टॅगमध्ये अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) अद्याप याबद्दल कोणतीही औपचारिक माहिती दिलेली नाही.
माहितीनुसार, फास्टॅगच्या नवीन टप्प्यात अनेक नवीन सुविधा जोडल्या जाऊ शकतात. यामुळे सर्वसामान्यांना खूप फायदा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फास्टॅगद्वारे कार इंश्युरन्स आणि इलेक्ट्रिक वाहने चार्ज केल्यानंतर पेमेंट करता येणार आहे.
Kia Carens Clavis EV होऊ शकते देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर Electric MPV, केव्हा होणार लाँच?
सरकार लवकरच फास्टॅगशी संबंधित आणखी एक सुविधा सुरू करण्याची तयारी करत आहे. काही काळापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती की वार्षिक फास्टॅग पासची सर्व्हिस 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर टोल टॅक्स ॲडव्हान्समध्ये भरता येईल. या सुविधेत, फास्टॅगचा रिचार्ज केल्यानंतर, एक वर्षासाठी किंवा 200 ट्रिप करता येतील. यासाठी तीन हजार रुपये भरावे लागतील.
आतापर्यंत फास्टॅगचा वापर फक्त महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर टोल कर भरण्यासाठी केला जात होता. याशिवाय, काही ठिकाणी पार्किंग शुल्क भरण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.