
Ola-Uber-Rapido Ban Update
महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या या पत्रात, बाईक टॅक्सी ॲप्स हटविण्याबाबतच्या पूर्वीच्या पत्रासंदर्भात काही प्रतिनिधित्व प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रतिनिधित्वांचे परीक्षण सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेतला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील आदेश मिळेपर्यंत ओला, उबर आणि रॅपिडोची ॲप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटविणे तसेच ॲपल ॲप स्टोअरवरील कारवाईबाबत कोणतीही अंमलबजावणी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित चाईक टॅक्सी ॲप्सवर तत्काळ कारवाईची शक्यता सध्या टळली आहे.
उपपोलिस महानिरीक्षक संजय शिंत्रे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रात महाराष्ट्र सायबर है राज्यातील सायबर गुन्ह्यांसाठी नियुक्त नोडल कार्यालय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, एका दिवसात नोटीस आणि त्यानंतर स्थगितीचा निर्णय झाल्याने बाईक टॅक्सी सेवांबाबत सुरू असलेल्या प्रशासकीय प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात राज्य सरकार, परिवहन विभाग आणि संबंधित कंपन्यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या परिवहन विभागाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र सायबर विभागाने १५ मे रोजी गुगल आणि ॲपलला नोटीस बजावली होती. ओला, उबर आणि रॅपिडोमार्फत आवश्यक परवानग्या व शासनाची मान्यता न घेता बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.