PM Modi Convoy Cars : मोदींच्या ताफ्यात आता फक्त Range Rover आणि Fortuner; कोणती कार दमदार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात प्रामुख्याने दोन गाड्यांचा दबदबा पाहायला मिळाला. यामध्ये रेंज रोव्हर आणि दुसरी फॉर्च्युनर आहे. या बदलामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात आणि सोशल मीडियावर एकाच चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये नक्की ताकदवान कोणती? असा प्रश्न पडला आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षची जबाबदारी असलेल्या एसपीजी कडून रेंज रोव्हरला सर्वाधिक पसंती मिळाली. व्हीआयपी मूव्हमेंटसाठी वापरी जाणारी ही रेंज रोव्हर आधुनिक आणि कस्टमाईज्ड असते. या गाडीत बुलेट रेझिस्टंट, हाय-टेक कम्युनिकेशन सिस्टम, ब्लास्ट प्रोटेक्शन आणि मजबूत बॉडी शेल आहेत. ही गाडी वजनाने जड आणि पॉवरफुल इंजिन असल्यामुळे रेंज रोव्हरचे मायलेज अवघे ६ ते ८ किलोमीटर प्रति लीटर इतकेच आहे.
भारतीय राजकारणी, अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांची पहिली पसंती म्हणून फॉर्च्युनर ओळखली जाते. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातही याचा गाडीचा समावेश आहे. मायलेजच्या बाबतीत ही रेंज रोव्हरपेक्षा खुप पुढे आहे. या गाडीचे डिझेल व्हेरिएंट साधारणपणे १० ते १४ किलोमीटर प्रति लीटर इतके आहे.
तसेच कठीण आणि खडतर रस्त्यांवरही या गाडीचा परफॉर्मन्स आणि चेसिसची मजबुती अत्यंत विश्वासार्ह मानली जाते. सुरक्षेसाठी या गाडीत मल्टीपल एअरबॅग्ज आणि व्हेईकल स्टॅबिलीटी कंट्रोल सारखे फीचर्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळती.
तुलना करायची झाल्यास एकीकडे रेंज रोव्हरचे सुरक्षा आणि व्हिआयपी लूकसाठी दमदार मानली जाते. तर टोयटा फॉर्च्युनरही कमी खर्चात दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज देते. पंतप्रधानांच्या ताफ्यात या गाड्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.






