HSRP Number Plate साठी अखेरचे काही तास बाकी (फोटो सौजन्य: Pinterest)
गेल्या काही वर्षभरात वाहनांच्या चोरीच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळेच राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे HSRP Number Plate अनिवार्य करण्याचा. हा निर्णय घेतल्यानंतर वाहन चालकांचा गोंधळ उडाला आणि जो तो लवकरात लवकर ही नंबर प्लेट लावण्यासाठी धावाधाव करू लागला. नागरिकांचा हाच गोंधळ पाहता राज्य सरकारने एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची मुदत एकदा नव्हे तर तीनदा वाढवली. तरी देखील कित्येक चालकांनाही अजूनही ही नंबर प्लेट बसवली नाही.
पुणेकरांनी HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयाचे स्वागत संथ गतीनेच केलेले दिसते. 15 ऑगस्ट 2025 ही अंतिम मुदत जवळ येत असताना, शहरातील अजूनही 20 लाख वाहनचालकांनी हाय सिक्योरिटी नंबर प्लेट बसवलेली नाही. पुण्यातील 26 लाख 33 हजार वाहनांपैकी आतापर्यंत फक्त 7 लाख 37 हजार 219 वाहनधारकांनीच HSRP प्लेटसाठी अर्ज केला असून, त्यापैकी 5 लाख 19 हजार 760 वाहनांवरच प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत.
दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी
सुरुवातीला फिटमेंट सेंटर्सची संख्या कमी असल्याने अडचणी येत होत्या, नंतर ती काही प्रमाणात वाढवण्यात आली. तरीही शहरातील फक्त 206 फिटमेंट सेंटर्स वाहनांच्या प्रचंड संख्येच्या तुलनेत अपुरी ठरत आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नंबर प्लेट्स बसवणाऱ्या रोस्मैटो कंपनीला सेंटर्सची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
Yezdi Roadster 2025 दमदार परफॉर्मन्ससह क्लासिक Bike, आवडीनुसार करा Customize
जी वाहनं एप्रिल 2019 च्या पूर्वीची आहेत, त्यांच्यासाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य असणार आहे. याचाच अर्थ जी वाहनं एप्रिल 2019 नंतरची आहेत त्यांना HSRP बंधनकारक नसणार. मात्र, आता लवकरात लवकर ही नंबर प्लेट बसवणे महत्वाचे आहे. अन्यथा तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड बसणार आहे. अशातच, पुन्हा एकदा मुदतवाढ व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.