Mahindra ची 'ही' कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी
देशात इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कारला चांगली मागणी मिळत आहे. अनेक वाहन खरेदीदार इंधनावर चालणाऱ्या वाहनापेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. ग्राहकांचा इलेक्ट्रिक कारसाठी वाढता प्रतिसाद अनेक ऑटो कंपन्यांना इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी Mahindra ने सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दोन धमाकेदार इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या. या वाहनांना ग्राहकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. म्हणूनच कंपनीने BE 6 लिमिटेड बॅटमॅन एडिशन लाँच केले. कंपनीने अधिकृतपणे या कारची डिलिव्हरी सुरू केली आहे. सुरुवातीला डिलिव्हरी 20 सप्टेंबर रोजी, आंतरराष्ट्रीय बॅटमॅन दिनी सुरू होणार होती, परंतु नंतर ती 25 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
Thalapathy Vijay च्या ताफ्यात एकापेक्षा एक Luxury Cars चा समावेश, किंमत तर विचारूच नका
हे मॉडेल BE 6 ची एक स्पेशल लिमिटेड एडिशन आहे. हे मॉडेल सुरुवातीला फक्त 300 युनिट्सपर्यंत मर्यादित होती. मात्र, प्रचंड मागणीमुळे, कंपनीने ही संख्या 999 युनिट्सपर्यंत वाढवली, ज्यामुळे अधिक ग्राहकांना हे स्पेशल एडिशन खरेदी करण्याची संधी मिळाली. त्याची एक्स-शोरूम किंमत 27.79 लाख आहे, जी टॉप-स्पेक पॅक थ्री व्हेरिएंटपेक्षा अंदाजे 89,000 रुपयांनी जास्त आहे.
महिंद्रा यांनी BE 6 बॅटमॅन एडिशनच्या डिझाइनवर विशेष लक्ष दिले आहे. कारच्या संपूर्ण बॉडीला कस्टम सॅटिन ब्लॅक फिनिश देण्यात आला आहे, ज्यामुळे ती अत्यंत प्रीमियम आणि पॉवरफुल बनते. कॉन्ट्रास्टिंग अल्केमी गोल्ड पेंट केलेले सस्पेंशन आणि ब्रेक कॅलिपर्स तिला एक मजबूत स्पोर्टी लूक देतात.
अरे Maruti Suzuki Ertiga स्वस्त झाली रे! मिळणार पहिल्यापेक्षा जास्त फीचर्स, नवीन किंमत…
या कारचे इंटीरियर त्याच्या एक्सटीरियरइतकेच खास आहे. यात चारकोल लेदर इन्स्ट्रुमेंट पॅनेल, गोल्ड सेपिया स्टिचिंगसह Suede लेदर अपहोल्स्ट्री आणि गोल्ड अॅक्सेंट्स देण्यात आले आहेत. स्टीअरिंग व्हील, इन-टच कंट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सिस्टमवरही आकर्षक गोल्ड डिटेलिंग पाहायला मिळते.
जेव्हा ही कार सुरू केली जाते, तेव्हा इन्फोटेनमेंट स्क्रीनवर ‘बैटमॅन वेलकम अॅनिमेशन’ दिसतो, जो अनुभव अधिक खास बनवतो. याशिवाय, कारच्या एक्सटीरियर साउंड प्रोफाइलमध्येही बैटमॅन थीमचा समावेश आहे, ज्यामुळे ही कार इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी भासते.
महिंद्रा BE 6 बॅटमॅन एडिशन मध्ये 79 kWh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार पूर्ण चार्जवर 683 किमी पर्यंत रेंज देते. रिअल-वर्ल्ड कंडिशन्समध्ये, एसी सुरू असतानाही ही कार सहजपणे 500 किमीपेक्षा अधिक अंतर पार करू शकते.