अरे Maruti Suzuki Ertiga स्वस्त झाली रे!
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्यांनी अनेक कार ऑफर केल्या आहेत. यातील काही कार्स इतक्या लोकप्रिय ठरल्या आहेत की नवीन कार लाँच होत असून सुद्धा ग्राहकांचा प्रतिसाद कमी झालेला नाही. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Maruti Suzuki Ertiga.
फेस्टिव्ह सिझन सुरु होण्यापूर्वी, मारुती सुझुकी एर्टिगा नवीन फीचर्स आणि डिझाइन अपडेटसह लाँच करण्यात आली आहे. यात काळ्या रंगांसह एक नवीन रूफ स्पॉयलर आहे, जो सर्व व्हेरिएंटमध्ये स्टॅंडर्ड असेल. या बदलांमुळे एर्टिगाचा लूक आणखी स्पोर्टी आणि प्रीमियम झाला आहे. तसेच जीएसटी 2.0 सुधारणांनंतर मारुती सुझुकी एर्टिगाच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बदल झाले आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.
नवीन GST चा फायदाच फायदा! भारतीयांची लाडकी Hero Passion Plus ची नवीन किंमत थेट हजारांवर
एर्टिगाची एसी सिस्टम अपग्रेड करण्यात आली आहे. पूर्वी, दुसऱ्या रांगेतील व्हेंट्स छतावर होते, परंतु आता ते सेंटर कन्सोलच्या मागे हलवण्यात आले आहेत. तिसऱ्या रांगेत स्वतंत्र एसी व्हेंट्स आणि ॲडजस्टेबल ब्लोअर कंट्रोल्स देखील आहेत. हा बदल सर्व प्रवाशांना चांगला कूलिंग अनुभव देईल.
एर्टिगाच्या नवीन अपडेटमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी USB-C चार्जिंग पोर्ट देखील समाविष्ट आहेत, ज्यामुळे चार्जिंगच्या गरजा पूर्ण करणे सोपे होईल. कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 1.5 -लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 102 बीएचपी आणि 136.8 एनएम टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक समाविष्ट आहे. सीएनजी व्हर्जन फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.
ऑगस्ट 2025 मध्ये, मारुती सुझुकी एर्टिगा ही एसयूव्ही ट्रेंडला मागे टाकत 18,445 युनिट्स विकून भारतातील सर्वाधिक विक्री होणारी पॅसेंजर व्हेईकल बनली. एर्टिगाने मारुती डिझायर आणि ह्युंदाई क्रेटा सारख्या लोकप्रिय कारला मागे टाकले.
Toyota ची ‘ही’ SUV फक्त काहीच सेकंदात तुमच्या घरी होईल दाखल, फक्त इतकाच असेल EMI?
जीएसटी मधील सुधारणांनंतर, मारुती सुझुकी एर्टिगाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता ₹8.80 लाख आहे. व्हेरिएंटनुसार, 50 हजारांपर्यंत ग्राहकांची पर्यंत बचत होऊ शकते, ज्यामुळे ती कुटुंबांसाठी आणखी परवडणारी पर्याय बनते.
एर्टिगा भारतीय बाजारपेठेतील काही लोकप्रिय एमपीव्हींशी स्पर्धा करते. यामध्ये Toyota Rumion चा समावेश आहे, जो मूलतः एर्टिगाचा रिबॅज्ड व्हर्जन आहे. किआ कॅरेन्स देखील एर्टिगासोबत चांगली स्पर्धा करत आहे. तर दुसरीकडे Mahindra Marazzo ग्राहकांना अधिक स्पेस आणि पॉवरफुल इंजिन पर्याय देते. महत्वाची गोष्ट म्हणजे, या कारमध्ये सीएनजी व्हेरिएंट उपलब्ध नाही, तर एर्टिगा तिच्या परवडणाऱ्या सीएनजी मॉडेलमुळे कुटुंब खरेदीदारांमध्ये आवडती बनली आहे.