फोटो सौजन्य: @mahindraesuvs (X.com)
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या जातात. एसयूव्ही दिसायला दिमाखदार आणि परफॉर्मन्समध्ये दमदार असतात, ज्यामुळे ग्राहक नेहमीच एसयूव्हीला प्राधान्य देत असतात. देशात अनेक एसयूव्ही उत्पादक कंपन्या आहेत. महिंद्रा ही त्यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी.
इलेक्ट्रिक सेगमेंटमधील वाढती मागणी लक्षात घेत महिंद्राने BE6 and XEV 9e या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. आता कंपनीने सोशल मीडियावर त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा BE6 च्या ब्लॅक एडिशनचा एक नवीन टीझर रिलीज केला आहे. ही ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल, जी ब्लॅक-आउट व्हर्जनमध्ये येईल चला या नवीन एसयूव्हीबद्दल जाणून घेऊयात.
महिंद्रा BE6 ब्लॅक एडिशनमधील सर्वात मोठा बदल त्याच्या लूकमध्ये दिसून येईल. यात ब्लॅक फिनिश अलॉय व्हील्स, पियानो ब्लॅक इन्सर्ट आणि ब्लॅक अपहोल्स्ट्री असेल, ज्यामुळे याचे इंटिरिअर आणि एक्सटिरिअर दोन्हीही प्रीमियम आणि आकर्षक दिसतील. ही कार केवळ रंगातच नाही तर स्टाईलमध्येही खास असेल. या कारचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कार्बन एडिशन आणि XUV700 इबोनी एडिशनच्या धर्तीवर याचे नाव ठेवण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा BE6 ब्लॅक एडिशनमध्ये मेकॅनिकल लेव्हलवर कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. मात्र, कंपनी त्यात ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) व्हर्जन सादर करण्याची थोडीशी शक्यता आहे.
Honda Unicorn फक्त 5 हजारांच्या EMI वर मिळू शकते का? कसा असेल हिशोब?
महिंद्रा BE6 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रेंज आणि चार्जिंग क्षमता. ही इलेक्ट्रिक SUV एका पूर्ण चार्जवर 682 किमी पर्यंत रेंज देऊ शकते, जे या सेगमेंटमध्ये खूपच चांगले आहे. चार्जिंग स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, तिला DC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल. 175kW चार्जरसह, ही कार फक्त 20 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. मात्र, सध्या पब्लिक चार्जिंग स्टेशनवर फक्त 60 kW किंवा 120 kW चार्जर उपलब्ध आहेत.
महिंद्रा BE6 ब्लॅक एडिशन त्याला EV सेगमेंटमध्ये ऑल-ब्लॅक लूक तसेच उत्कृष्ट रेंज आणि फास्ट चार्जिंग क्षमतेसह एक वेगळी ओळख देणार आहे. महिंद्राचा हा निर्णय विशेषतः अशा ग्राहकांना आवडेल ज्यांना प्रीमियम लूकसह लॉन्ग रेंज आणि प्रगत फीचर्स हवी आहेत.