Honda Unicorn फक्त 5 हजारांच्या EMI वर मिळू शकते का? फोटो सौजन्य: @honda2wheelerin (X.com)
भारतात बजेट फ्रेंडली बाईकच्या किंमत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातही जर बाईक उत्तम मायलेज देत असेल तर नक्कीच ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतात. देशात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. होंडा ही त्यातीलच एक जिची युनिकॉर्न बाईक ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.
भारतीय बाजारपेठेत होंडा कंपनीची लोकप्रिय युनिकॉर्न बाईकला मोठी मागणी आहे. या बाईकचा मुकाबला टीव्हीएस अपाचे RTR 160 आणि बजाज पल्सर 150 सारख्या बाईक्ससोबत होतो. जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती फुल पेमेंट करून घेणे आवश्यक नाही. तुम्ही होंडा युनिकॉर्न EMI वर सुद्धा खरेदी करू शकता. चला, त्याचा संपूर्ण हिशोब पाहूया.
Toyota Urban Cruiser Taisor चे अपडेटेड व्हर्जन सादर, आता अनुभवा अधिक सुरक्षित प्रवास
राजधानी दिल्लीमध्ये होंडा युनिकॉर्नची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,20,751 रुपये आहे. जर तुम्ही ती दिल्लीमध्ये खरेदी केली, तर ऑन-रोड किंमत सुमारे 1.44 लाख रुपये येते. बाईक लोनवर घेण्यासाठी तुम्हाला 10 हजार रुपये डाउन पेमेंट करावे लागतील. त्यानंतर 1.34 लाख रुपये फाइनान्स करावे लागतील. 9% व्याजदराने 3 वर्षांसाठी लोन घेतल्यास EMI अंदाजे 5 हजार रुपये येईल.
Honda Unicorn मध्ये एलईडी हेडलाइट, सिंगल चॅनेल ABS, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एकापेक्षा जास्त रंगांचे पर्याय आणि आरामदायी सीटिंग अशी फीचर्स मिळतात. ही बाईक युवा आणि ज्येष्ठ रायडर्स दोघांसाठीही योग्य ठरते.
होंडा युनिकॉर्नच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 162.71 सीसी सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, BS-VI इंजिन आहे. बाईकचे इंजिन 13 बीएचपी पॉवर आणि 14.58 एनएम टॉर्क जनरेट करते. वाहनाचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याचा टॉप स्पीड 106 किमी प्रतितास आहे.
होंडाची ही बाईक उत्तम फ्युएल एफिशियन्सी देते. ARAI प्रमाणित मायलेज 60 किमी प्रति लिटर आहे. यात 13 लिटरचा फ्युएल टँक दिला आहे. टँक फुल भरल्यास अंदाजे 780 किमी अंतर पार करता येते. त्यामुळे ही बाईक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही योग्य आहे.