Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या चाकण इथल्या अत्याधुनिक कारखान्यातून ३० लाखवे वाहन यशस्वीरीत्या बाहेर पडले असून, 'BE 6' ही इलेक्ट्रिक कार या ऐतिहासिक विक्रमाची मानकरी ठरली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 16, 2026 | 02:29 PM
महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण
Follow Us
Follow Us:

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक नवा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. महिंद्राच्या चाकण येथील मुख्य कारखान्यातून ३० लाखावे वाहन यशस्वीरीत्या उत्पादन होऊन बाहेर पडले आहे. डिसेंबर २००९ मध्ये सुरू झालेल्या या प्लांटसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, म्हणायला हवं. विशेष म्हणजे, ही ३० लाखवी ऐतिहासिक गाडी महिंद्राची येणारी इलेक्ट्रिक कार ‘Mahindra BE 6’ ठरली आहे. हे पाऊल महिंद्राच्या ‘बॉर्न-इलेक्ट्रिक’ पोर्टफोलिओचे वाढते महत्त्व अजून अधोरेखित करते.

अवघ्या २७ महिन्यांत १० लाख गाड्यांची निर्मिती

या कामगिरीतील सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे महिंद्राचा वाढलेला उत्पादनाचा वेग. पहिल्या १० लाख गाड्या तयार करण्यासाठी कंपनीला १०७ महिने लागले होते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर आणि वाढत्या मागणीमुळे शेवटच्या १० लाख वाहनांचे उत्पादन अवघ्या २७ महिन्यांत पूर्ण करण्यात आले.

लुकमध्ये खतरनाक अन् थारपेक्षाही भारी; पाहा Chery iCar V25 चा जलवा! लवकरच मार्केटमध्ये येण्याची शक्यता

६५७ एकरांवर पसरलेला हा चाकण प्लांट आता महिंद्राचा पॅसेंजर गाड्या, इलेक्ट्रिक वाहने आणि व्यावसायिक वाहनांचा मुख्य हब बनला आहे. सध्या या एकाच ठिकाणी १९ मॉडेलच्या तब्बल ४५० हून अधिक व्हेरिएंट्सचे उत्पादन केले जाते. स्कॉर्पिओ एन, थार, XUV 3XO, XUV700 आणि नवीन BE 6 व XEV 9e यांसारख्या लोकप्रिय गाड्यांच्या यशामुळे उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला आहे. जून २०२६ मध्ये महिंद्राच्या एसयूव्ही विक्रीत ३७% वाढ झाली असून ती ६०,००० युनिट्सच्या पार गेली आहे.

‘इंडस्ट्री ४.०‘ आणि हायटेक रोबोट्सचा वापर

महिंद्राने चाकण प्लांटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला गेलेला आहे. सध्या या कारखान्यात,

  • १५०० हून अधिक रोबोट्स कार्यरत आहेत.
  • बॉडी शॉपमध्ये ९८ टक्क्यांपेक्षा जास्त ऑटोमेशन  म्हणजेच स्वयंचलित यंत्रणा आहे.
  • उत्पादनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल ट्रेसिबिलिटी यांसारख्या ‘इंडस्ट्री ४.०’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
  • गुणवत्ता तपासणीसाठी रोबोटिक पेंटिंग, रिअल-टाइम वेल्ड मॉनिटरिंग, ३डी स्कॅनिंग आणि “नो फॉल्ट फॉरवर्ड” सारख्या कडक सुरक्षा यंत्रणा आहेत.
  • वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि इंजिनच्या गाड्या एकाच वेळी तयार करण्यासाठी ७ मल्टी-मॉडेल असेंब्ली लाईन्स वापरल्या जातात.
Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या

पर्यावरणपूरक आणि ‘वॉटर पॉझिटिव्ह‘ कारखाना

महिंद्राचा चाकण प्लांट पर्यावरणाचीही तेवढीच काळजी घेतो. या प्लांटला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ५०% पेक्षा जास्त ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जेपासून मिळते. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन तर १००% या ऊर्जेवर चालते. हा कारखाना ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ (कचरामुक्त) प्रमाणित आहे. तसेच, हा प्लांट १३१% वॉटर पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच जेवढे पाणी वापरले जाते, त्यापेक्षा जास्त पाणी निसर्गाला परत केले जाते.

जागतिक बाजारपेठेत मोठा दबदबा

चाकण प्लांट केवळ भारताचीच नाही तर जगाची गरज भागवत आहे. इथे तयार होणारी वाहने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केली जातात. आगामी काळातही महिंद्राच्या जागतिक विस्तार आणि भविष्यातील गाड्यांच्या धोरणात चाकण प्लांट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Web Title: Mahindras chakan plant completes 30th lakh vehicle production auto nes marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ
1

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!
2

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री
3

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री
4

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.