Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका चार्जमध्ये ५२६ किमी रेंज! कियाची नवीन ‘Syros EV’ भारतात दाखल; बुकिंग सुरू.

किया इंडियाने ५२६ किमीच्या दमदार रेंजसह आपली नवीन 'Syros EV' भारतात सादर केली असून २५,००० रुपयांमध्ये तिचे बुकिंग सुरू झाले आहे. या कारमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक 'BaaS' बॅटरी प्लॅन, लाईफटाईम बॅटरी वॉरंटी आणि लेव्हल २ ADAS सारखे प्रगत सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 15, 2026 | 07:47 PM
एका चार्जमध्ये ५२६ किमी रेंज! कियाची नवीन ‘Syros EV’ भारतात दाखल; बुकिंग सुरू.
Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची  क्रेझ वेगाने वाढत असताना, प्रख्यात कोरियन कार उत्पादक कंपनी ‘किआ इंडिया’ने (Kia India) आपली बहुप्रतिक्षित Syros EV वरून अखेर पडदा उठवला आहे. ही कंपनीची भारतातील दुसरी मास-मार्केट इलेक्ट्रिक कार आहे. ग्राहकांसाठी या कारचे प्री-बुकिंग अवघ्या २५,००० रुपयांच्या टोकन रक्कमेवर सुरू करण्यात आले आहे.

५००+ किमी रेंज देणारी पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV

Kia Syros EV ही आपल्या सेगमेंटमधील पहिलीच कार ठरली आहे, जिची एआरएआय (ARAI) प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज ५०० किमीचा टप्पा पार करते. बाजारात ही कार दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध असेल,

१. ४२ kWh बॅटरी पॅक: सिंगल चार्जमध्ये ४४३ किमी रेंज.

२. ५१.४ kWh बॅटरी पॅक: सिंगल चार्जमध्ये तब्बल ५२६ किमी रेंज.

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान

या दोन्ही प्रकारांमध्ये एक पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, जी १७१ PS पॉवर आणि २५५ Nm टॉर्क जनरेट करते. लाँग-रेंज मॉडेल अवघ्या ८.१ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास असा वेग पकडू शकते. याशिवाय, १०० kW च्या DC फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार फक्त ३९ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होते.

‘BaaS’ आणि लाईफटाईम बॅटरी वॉरंटीचा मोठा सपोर्ट

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कियाने एक अनोखा प्लॅन आणला आहे. यात ग्राहकांना लाईफटाईम हाय-व्होल्टेज बॅटरी वॉरंटी आणि ‘अश्योर्ड बायबॅक’ (खरेदीची पूर्ण हमी प्रोग्राम दिला जात आहे. तसेच, BaaS (Battery-as-a-Service) पर्यायामुळे ग्राहकांना बॅटरी भाड्याने घेता येईल, ज्यामुळे कारची सुरुवातीची किंमत बरीच कमी होईल.

आधुनिक लुक आणि फीचर्सचा भरणा

लुकचा विचार केला तर यात कियाचा सिग्नेचर ‘डिजिटल टायगर फेस’, व्हर्टिकल एलईडी हेडलाइट्स, १७ इंचाचे क्रिस्टल-कट ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि फ्लश डोअर हँडल्स दिले आहेत.

कारच्या आत ३० इंचाचा पॅनोरामिक डिस्प्ले आहे, ज्यामध्ये १२.३ इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, १२.३ इंचाचे डिजिटल क्लस्टर आणि ५ इंचाचा क्लायमेट कंट्रोल डिस्प्ले एकत्र देण्यात आला आहे. याशिवाय वायरलेस चार्जिंग, ८-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टीम आणि पॅनोरॅमिक सनरुफ देखील आहे.

किया इंडियाचा मोठा पुढाकार; ग्राहकांसाठी ‘ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६’चे आयोजन

सुरक्षेची तगडी ढाल

सुरक्षेसाठी या कारमध्ये लेव्हल २ ADAS (Advanced Driver Assistance Systems) तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामध्ये १६ पेक्षा जास्त ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्स आहेत (उदा. लेन कीप असिस्ट, स्मार्ट क्रूझ कंट्रोल आणि इमर्जन्सी ब्रेकिंग). सोबतच ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग यांसारखे २५ स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: Kia syros ev launched in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • kia

संबंधित बातम्या

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने
1

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी
2

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार
3

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली
4

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.