दिवाळीत करा स्वप्नपूर्ती! 5 लाखांच्या आत दारात उभी करा नवी कार; ‘हे’ आहेत शानदार पर्याय
सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट ५ लाखांपर्यंत असेल, तर या कार तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात. चला त्यांची किंमत, मायलेज आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
Best Cars Below 5 Lakhs: सरकारने छोट्या गाड्यांवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी केला आहे, ज्यामुळे अनेक लोकप्रिय हॅचबॅक आणि एंट्री-लेव्हल कार अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. आत जर तुम्ही सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 5 लाखांपर्यंत असेल, तर या कार तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात. चला त्यांची किंमत, मायलेज आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
1. मारुती वॅगनआर (Maruti WagonR)
सर्वाधिक विक्री: जागा (Space) आणि आरामदायीपणामुळे ही कार लोकप्रिय आहे. ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक आहे.
एक्स-शोरूम किंमत: ₹4.99 लाख ते ₹6.95 लाख.
2. टाटा टियागो (Tata Tiago)
सुरक्षितता आणि स्टाइल: ही कार तिच्या स्टायलिश लुक आणि दमदार सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते.
एक्स-शोरूम किंमत: ₹4.57 लाख ते ₹7.82 लाख.
इंजिन/मायलेज: यात 1119 सीसी पेट्रोल इंजिन असून, ते प्रति लिटर 19 ते 23 किलोमीटर मायलेज देते.
सुरक्षा रेटिंग: या कारला ग्लोबल NCAP कडून ४-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.