(फोटो सौजन्य-AI एआय)
नवीन मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट: इंजिन आणि फीचर्समध्ये मोठे बदल
मारुती बलेनोच्या exterior, powertrain आणि फीचर्समध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील. या प्रीमियम हॅचबॅकमध्ये नवी स्विफ्ट आणि डिझायरप्रमाणेच १.२-लीटर, ३-सिलिंडर Z-सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात येईल, जे ८० bhp पॉवर आणि ११२ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध असेल.
विशेष म्हणजे, नवीन बलेनोमध्ये CNG-AMT चा पर्यायही दिला जाणार आहे. टाटा अल्ट्रॉझनंतर या विभागात CNG सोबत ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देणारी ही दुसरी गाडी ठरेल. याशिवाय, केबिनमध्ये ड्युअल-टोन थीम, नव्या सीट अपहोल्स्ट्री, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि सुरक्षेसाठी ADAS तंत्रज्ञान दिले जाईल. गाडीच्या बाहेरील डिझाइनमध्ये नवी ग्रिल, री-डिझाइन केलेले फ्रंट व रिअर बंपर आणि नवीन अलॉय व्हील्स पाहायला मिळतील.
रेनॉ ट्रायबर टर्बो: अधिक पॉवर आणि ड्युअल-सिलिंडर CNG टेक्नोलॉजी
रेनॉ आपली ७-सीटर MPV ट्रायबर अधिक शक्तिशाली १.०-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह लाँच करत आहे. हे इंजिन ९९ bhp पॉवर आणि १६० Nm टॉर्क जनरेट करते (जे सध्याच्या ७१ bhp च्या नॅचरली एस्पिरेटेड इंजिनपेक्षा खूप जास्त आहे). हे इंजिन रेनॉ कायगर टर्बोमधून घेण्यात आले आहे.
यासोबतच कंपनी ट्रायबरचे टर्बो-CNG व्हर्जन आणि ड्युअल-सिलिंडर फॅक्टरी-फिटेड CNG पर्यायही आणू शकते. यामध्ये बूट फ्लोअरच्या खाली दोन छोटे CNG सिलेंडर बसवले जातील, ज्यामुळे डिकीमधील बूट स्पेस मोकळी राहील. हा पर्याय ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध होण्याची शक्यता आहे.






