फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच वाढत्या मागणीमुळे आता अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी इंधावणार चालणाऱ्या कार उत्पादित करीत होत्या, त्याच आज इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. आता मारुती सुझकी देखील आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.
मारुती सुझुकीच्या इंडियाची पहिली इलेक्ट्रिक कार e-Vitara एसयूव्ही लवकरच लाँच होऊ शकते. ही कार नेक्सा डीलरशिपवरून विकली जाईल. मारुती सुझुकीच्या अध्यक्षांच्या मते, बहुप्रतिक्षित ई विटारा सप्टेंबरमध्ये लाँच केली जाईल.
मारुती सुझुकी त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा दोन बॅटरी पॅक पर्यायांसह लाँच करणार आहे – 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅट. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ग्राहकांना सिग्मा, डेल्टा आणि झेटा/अल्फा असे तीन ट्रिम मिळतील.
500 KM ची रेंज, हायटेक फीचर्स आणि बरंच काही ! उद्या लाँच होणार Tata Harrier EV
किंमतींबद्दल बोलायचे झाले तर, सिग्मा व्हेरियंटची (49 किलोवॅट) एक्स-शोरूम किंमत 18 लाख रुपये असेल, तर डेल्टा व्हेरियंटची (49 किलोवॅट) किंमत 19.50 लाख रुपये असेल. झेटा व्हेरियंटची (49 किलोवॅट) किंमत 21 लाख रुपये असेल.
झेटा व्हेरियंटचा दुसरा पर्याय 61 किलोवॅट बॅटरी पॅकसह येईल, ज्याची किंमत 22.50 लाख रुपये असेल. टॉप व्हेरियंट अल्फा (61 किलोवॅट तास) ची किंमत 24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त झेटा व्हेरियंट दोन्ही बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे या व्हेरियंटमध्ये सर्वाधिक पर्याय उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकी ई-विटारा एकूण 10 आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये 6 मोनो-टोन आणि 4 ड्युअल-टोन रंगांचा समावेश आहे. मोनो-टोन पर्यायांमध्ये नेक्सा ब्लू, स्प्लेंडिड सिल्व्हर, आर्कटिक व्हाइट, ग्रँडियर ग्रे, ब्लूश ब्लॅक आणि ऑप्युलेंट रेड सारखे कलर्स उपलब्ध आहेत.
ई-विटारा प्रीमियम बनवण्यासाठी, कंपनीने त्यात अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. त्यात एलईडी हेडलाइट्स, डीआरएल आणि टेललॅम्प मिळतील, जे त्याला आधुनिक लूक देतील. एसयूव्हीमध्ये 18-इंच व्हील्स आणि सक्रिय एअर व्हेंट ग्रिल आहे जे एरोडायनॅमिक कार्यक्षमता वाढवते.
Ola, Ather ची दांडी गुल करण्यासाठी लवकरच लाँच होणार ‘हे’ इलेक्ट्रिक स्कूटर
पॅनोरामिक सनरूफ, मल्टी-कलर अँबियंट लाइटिंग आणि 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखी डिजिटल फीचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत. ही सिस्टम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते.
मारुती ई-विटारामध्ये लेव्हल 2 ADAS टेक्नॉलॉजी दिले जाईल, ज्यामध्ये लेन कीप असिस्ट आणि अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारख्या अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्सचा समावेश असेल. एसयूव्हीमध्ये 7 एअरबॅग्जची सुविधा असेल जी ड्रायव्हर आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करते. यात ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 360-डिग्री कॅमेरा आणि फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्सचा समावेश आहे.