फोटो सौजन्य: X.com
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ग्राहक आता इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना खरेदी करताय. तसेच, अनेक कार उत्पादक कंपन्या सुद्धा मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. आता लवकरच देशातील आघाडीची ऑटो कंपनी Maruti Suzuki देखील त्यांची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर, मारुती सुझुकी अखेर त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार, e-Vitara लाँच करत आहे. कंपनीने पहिल्यांदा इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये हे मॉडेल प्रदर्शित केले होते आणि आता त्याचे लाँचिंग डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे. मारुतीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विकली जाणार आहे.
‘या’ SUV च्या मागे ग्राहक हात धुवून लागलेत! फक्त 30 दिवसात विकल्या 32000 युनिट्स, किंमत…
मारुती e-Vitara चं डिझाइन तिला एक बॅलन्स्ड आणि प्रॅक्टिकल SUV बनवतं. तिची लांबी 4275 मिमी, रुंदी 1800 मिमी, आणि व्हीलबेस 2700 मिमी इतका आहे. ही SUV पारंपरिक मारुती SUV स्टाइल आणि आधुनिक फ्युचरिस्टिक डिझाइन यांचा उत्तम संगम सादर करते.
या कारचं प्रॉडक्शन गुजरातमधील हंसलपूर प्लांटमध्ये सुरू झालं आहे, जिथून मारुती आपले अनेक ग्लोबल मॉडेल्स निर्यात करते. कंपनीने e-Vitara साठी मोठं प्रॉडक्शन टार्गेट निश्चित केलं आहे, कारण ही SUV 100 पेक्षा जास्त देशांमध्ये एक्सपोर्ट केली जाणार आहे.
मारुती e-Vitara भारतात दोन बॅटरी पॅक ऑप्शन्स 49kWh आणि 61kWh सोबत उपलब्ध होणार आहे. टॉप व्हेरिएंटची रेंज सुमारे 500 किलोमीटरपर्यंत असेल, ज्यामुळे ती आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक SUVs पैकी एक ठरेल.
यात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली आहे, ज्यामुळे बॅटरीला कमी वेळेत 80% पर्यंत चार्ज करता येईल. कंपनीचा दावा आहे की e-Vitara शहरातील आणि महामार्गावरील दोन्ही प्रकारच्या ड्रायव्हिंगसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देईल.
e-Vitara ही आतापर्यंतची सर्वात फीचर-लोडेड मारुती SUV मानली जाऊ शकते. यात खालील अॅडव्हान्स फीचर्स दिले जाणार आहेत. यात 7 एअरबॅग्स,ADAS Level 2 ड्रायव्हर असिस्ट सिस्टम (ऑटोमॅटिक ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, अॅडॅप्टिव क्रूझ कंट्रोल), वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि व्हॉईस कमांड सपोर्ट
मारुती सुजुकी e-Vitara ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात महागडी SUV ठरणार आहे. ती Grand Vitara आणि Victoris पेक्षा वरच्या सेगमेंटमध्ये पोजिशन केली जाईल. या इलेक्ट्रिक कारची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही, पण अंदाज आहे की e-Vitara ची एक्स-शोरूम किंमत 25 लाख ते 30 लाखांच्या दरम्यान असेल.