फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी ही एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना असते. म्हणूनच अनेक ऑटो कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या SUV ऑफर करत असतात. देशातील आघाडीची ऑटो कंपनी Tata Motors ने सुद्धा उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. ग्राहक देखील अनेक वर्षांपासून कंपनीच्या कार्सना उदंड प्रतिसाद देत आहे. अशाच एका एसयूव्हीला ग्राहकांनी रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला आहे
टाटा मोटर्ससाठी फेस्टिव सीझन 2025 अत्यंत यशस्वी ठरला आहे. दिवाळीच्या काळात संपलेल्या या हंगामात कंपनीने तब्बल 1 लाखांहून अधिक कार्सची विक्री केली आहे. यामध्ये टाटाची सर्वाधिक लोकप्रिय आणि अनेकदा देशातील नंबर-1 SUV ठरलेली Tata Punch ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आता 5 सेफ्टी रेटिंग मिळवण्यासाठी ऑटो कंपन्यांना जास्त कसरत करावी लागणार, Euro NCAP ने बदलले नियम
नवरात्रीपासून दिवाळीपर्यंतच्या 30 दिवसांत पंचच्या तब्बल 32,000 युनिट्सची विक्री झाली. वार्षिक तुलनेत या मॉडेलच्या विक्रीत 29 टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यातही पंचच्या 15,891 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. GST 2.0 लागू झाल्यानंतर पंचची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 5,49,990 लाख रुपये इतकी आहे. भारतीय बाजारात या कारची थेट स्पर्धा मारुती फ्रॉन्क्स, ह्युंदाई एक्स्टर, निसान मॅग्नाइट आणि रेनॉ काइगर यांसारख्या मॉडेल्सशी होते.
टाटा पंचमध्ये 1.2 लिटर Revotron इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 RPM वर 86 PS पॉवर आणि 3300 RPM वर 113 Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड असून 5-स्पीड AMT (ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन) चा पर्यायही दिला आहे.
मायलेजच्या बाबतीत, पंच मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 18.97 kmpl तर ऑटोमॅटिकमध्ये 18.82 kmpl इतकं इंधन कार्यक्षम आहे. शिवाय, या SUV चा इलेक्ट्रिक व्हर्जन देखील बाजारात उपलब्ध आहे.
टाटा पंचमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटो हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी अनेक प्रीमियम फीचर्स दिली आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, टाटा नेक्सन आणि अल्ट्रोझनंतर आता टाटा पंचलाही Global NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. यात प्रौढ प्रवाशांच्या संरक्षणासाठी 5-स्टार (16.453 गुण) आणि बाल प्रवाशांच्या संरक्षणासाठी 4-स्टार (40.891 गुण) अशी रेटिंग मिळाली आहे.