भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या लोकपालांना बीएमडब्ल्यू कारची भुरळ
सर्वसामान्य व्यक्ती असो की श्रीमंत उद्योगपती, आपल्या देशात प्रत्येकांमध्ये लक्झरी कार्सची तुफान क्रेझ पाहायला मिळते. कित्येकांचे तर स्वप्न असते की त्यांच्याकडे आलिशान कार असाव्यात. याच लक्झरी कार्सची भुरळ सध्या केंद्रीय लोकपाल आयोगाच्या 7 सदस्यांना पडली आहे. खरंतर, ज्यांच्यावर देशातील भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी असते अशा लोकपालांनीच एक दोन नव्हे 7 BMW कार्सचे खरेदी करण्याचे टेंडर काढले आहे. यामुळे लोकपाल आयोग वादात सापडला आहे. मात्र, BMW च्या या कारमध्ये असे काय खास आहे की चक्क लोकपालांनी हे खरेदी करण्याचे टेंडर काढले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टेंडर नोटीसमध्ये BMW 3 Series 330 Li चा उल्लेख आहे. BMW च्या 3 Series Long Wheelbase (LWB) लाइनअपचा भाग असलेल्या 330 Li मॉडेलची किंमत भारतात तब्बल 60.45 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, ज्याची ऑन-रोड किंमत सुमारे 70 लाखांपर्यंत जाते. ही कार त्याच्या लांब व्हीलबेसमुळे, प्रवाश्याना पुरेशी इंटिरिअर स्पेस देते. ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात लांब आणि सर्वात प्रशस्त कार आहे, जी आलिशान केबिनसह अंतिम आरामासाठी डिझाइन केलेली आहे.
चीनकडून आणखी एक धमाका! BYD नंतर ‘ही’ ऑटो कंपनीही भारतात येण्याच्या तयारीत? पेटंट केलं दाखल
नवीन BMW 3 Series Long Wheelbase (LWB) चे डिझाईन अत्यंत स्पोर्टी आणि आधुनिक आहे. याचा एकूण लूक स्टायलिश, आकर्षक आणि प्रीमियम फील देणारा आहे. समोरील बाजूस दिलेली BMW ची खास किडनी ग्रिल आणि दोन गोल LED हेडलाइट्स या कारला एक वेगळाच लूक देतात. यात अॅडॅप्टिव्ह LED हेडलाइट्स दिल्या आहेत, ज्यात कॉर्नरिंग लाइट फंक्शन देखील आहे. त्यामुळे रात्री किंवा कमी प्रकाशात कार चालवताना उत्कृष्ट प्रकाश आणि सुरक्षितता मिळते.
या कारची लांबी 4,819 मिमी आणि व्हीलबेस 2,961 मिमी आहे, ज्यामुळे ती आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक लांब आणि प्रशस्त कार ठरते. याचा लांब आणि स्लिम साइड प्रोफाइल तिला एलिगंट आणि लक्झरीयस लूक देतो. एक्सटिरिअर भागात वापरलेले अल्युमिनियम सॅटिन फिनिश पार्ट्स आणि मागील बाजूस दिलेला हाय-ग्लॉस ब्लॅक डिफ्यूझर या कारला अजूनच दमदार बनवतात.
Nissan Magnite SUV चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? EMI किती?
BMW 3 Series LWB च्या इंटिरिअरमध्ये अचूक फिटिंग आणि सूक्ष्म डिझाईन दिले गेले आहे, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे प्रीमियम आणि आरामदायक वाटतो. केबिनमध्ये अल्युमिनियम रॉम्बिकल अँथ्रासाइट फिनिश वापरली गेली असून त्यामुळे आतील भागाला एक स्पोर्टी आणि स्टायलिश लूक मिळतो.