फोटो सौजन्य: @TheANI_Official (X.com)
देशात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कार ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे एमजी मोटर्स. एमजीने देशात अनेक बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनी विशेषकरून इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे. कंपनीची MG Windsor EV भारतीय मार्केटमध्ये सर्वात जास्त पसंत केली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. याशिवाय MG Comet EV ही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्त कार म्हणून ऑफर करत आहे. पण आता कंपनीने भारतीय मार्केटमध्ये एका कारच्या व्हेरियंटची विक्री थांबवली आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
FASTag चा वार्षिक पास घेऊ की सतत रिचार्ज करत बसू, काय आहे फायदेशीर?
एमजी इंडियाने अलीकडेच MG Astor चे 2025 मॉडेल अपडेट केले आहे आणि त्याच्या काही व्हेरियंटच्या किंमती 38,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. त्याच वेळी, पॅनोरॅमिक सनरूफसह त्याचे व्हेरियंट देखील पूर्वीपेक्षा अधिक किफायतशीर बनले आहे. आता, कंपनीने भारतात त्यांचे 1.3-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन बंद केले आहे. त्याच्या 1.3-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन ऑप्शनमध्ये कोणते फीचर्स आले आहेत व त्याच्या इतर मॉडेल्समध्ये कोणते नवीन अपडेट्स आले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.
MG Astor च्या 1.3-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 140 पीएस पॉवर आणि 220 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये पूर्वी टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स येत असे, जे आता भारतात बंद करण्यात आले आहे.
एमजी अॅस्टर आता फक्त 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते, जे 110 पीएस पॉवर आणि 144 एनएम टॉर्क निर्माण करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 8-स्टेप CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शनसह दिले जाते. त्याच्या एंट्री-लेव्हल शाइन व्हेरियंटमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ आणि सहा-स्पीकर साउंड सिस्टम समाविष्ट आहे. यासोबतच, सिलेक्ट व्हेरियंटमध्ये सहा एअरबॅग्ज आणि प्रीमियम आयव्हरी लेदरेट सीट्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय, i-SMART 2.0 इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव पूर्वीपेक्षाही चांगला होतो.
Maruti Suzuki ची कार खरेदी करणार आहात? February 2025 मध्ये प्रीमियम कारवर लाखो रुपये वाचवाल
2025 MG Astor मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीटसह व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ऑटो एसी यासारख्या उत्तम फीचर्सचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, हीटेड आऊटसाइड मिरर (ORVM), ब्लाइंड स्पॉट असिस्टसह 360-डिग्री कॅमेरा, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल आणि लेव्हल-2 अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारखी अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स आहेत ज्यात इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन कीप असिस्ट यांचा समावेश आहे.
2025 एमजी अॅस्टर भारतात 10 लाख ते 17.56 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. ही कार हुंडई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा, किआ सेल्टोस, टोयोटा हॅरियर, स्कोडा कुशक आणि फोक्सवॅगन टायगुन सारख्या इतर कॉम्पॅक्ट एसयूव्हींशी स्पर्धा करते.