फोटो सौजन्य: @MGmotor/X.com
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार रेंज असणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. MG मोटर्सने सुद्धा काही उत्तम इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. MG Cyberster ही त्यांची इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार काही महिन्यांपूर्वीच लाँच झाली होती.
MG Cyberster लाँच झाल्यापासूनच तिला दमदार मागणी मिळत होती. या कारला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की तिच्या वेटिंग पिरियडमध्ये वाढ झाली आहे.
Renault E Kwid ब्राझीलमध्ये सादर, भारतात केव्हा होणार लाँच?
ऑटोमेकर एमजी मोटर्सकडून माहिती मिळाली आहे की त्यांची इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार, एमजी सायबरस्टरची मागणी भारतात सातत्याने वाढत आहे. लाँच झाल्यापासून दोन महिन्यांत, कंपनीने या कारच्या 256 युनिट्स विकल्या आहेत.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारची मागणी इतकी वाढली आहे की आता ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, MG Cyberster खरेदी करून घरी आणण्यासाठी सुमारे तीन ते चार महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागू शकतो.
एमजी मोटर्सने दोन महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात दोन लक्झरी इलेक्ट्रिक कार्स MG Cyberster आणि MG M9 लाँच केल्या होत्या. लाँच झाल्या झाल्या या दोन्ही कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. याच कारणामुळे एमजी मोटर्स आता भारतातील लक्झरी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे.
एमजी मोटर इंडिया येथील एमजी सिलेक्टचे अंतरिम प्रमुख मिलिंद शाह यांनी सांगितले की, “भारतातील लक्झरी ईव्ही सेगमेंटमध्ये दुसरे स्थान मिळवणे हे आमच्या मॉडेल्सना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचे प्रतीक आहे. एमजी सायबरस्टर आणि एमजी एम9 प्रेसिडेन्शियल लिमोझिन या दोन्ही कार्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत.”
MG Cyberster Electric Super Car मध्ये 77 किलोवॅट प्रति तासाची पॉवरफुल बॅटरी आणि मोटर आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 507 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.
एमजी मोटर्स भारतीय बाजारात सायबरस्टर 74.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केले आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू देखील शकते.