फोटो सौजन्य: @quatrorodas/X.com
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात. अशीच एक कंपनी म्हणजे Renault. कंपनीने आतापर्यंत अनेक उत्तम कार जगभरात लाँच केल्या आहेत. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर जास्त लक्षकेंद्रित करत आहे. नुकतेच कंपनीने त्यांची इलेक्ट्रिक कार ब्राझीलमध्ये सादर केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतात आणि जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, ऑटो कंपन्यांनी अनेक देशांमध्ये विविध सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहने सादर आणि लाँच केली आहेत. रेनॉल्टने ब्राझीलमध्ये क्विडची इलेक्ट्रिक व्हर्जन देखील सादर केली आहे. चला या नवीन कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
डेअरिंग तर बघा! ग्राहकाने चक्क OLA शोरूमच्या समोरच जाळली कंपनीची स्कूटर, नेमकं कारण काय?
रेनॉल्टची इलेक्ट्रिक क्विड ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनीने ही कार अनेक प्रभावी फीचर्स आणि डिझाइनसह सादर केली आहे.
ब्राझीलमध्ये सादर केलेल्या इलेक्ट्रिक क्विडमध्ये अनेक प्रभावी वैशिष्ट्ये आहेत. त्यात 225 लिटर बूट स्पेस, 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन मिररिंग, जीपीएस नेव्हिगेशन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन सेंटर कन्सोल, नवीन ई-शिफ्टर गिअरबॉक्स, टाइप सी चार्जिंग पोर्ट, 6 एअरबॅग्ज, एडीएएस, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, ब्लॅक इंटीरियर, टीपीएमएस, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, एबीएस, ईबीडी, रियर व्ह्यू कॅमेरा असे फीचर्स आहेत.
कंपनीकडून ब्राझीलमध्ये सादर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक क्विडमध्ये 26.8 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे ती एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटरपर्यंत धावू शकते. ही बॅटरी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 27 मिनिटांत 15 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते. यात 48 किलोवॅट क्षमतेची मोटर देण्यात आली आहे, जी 65 हॉर्सपॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. त्यामुळे ही कार फक्त 3.9 सेकंदात 0 ते 50 किमी प्रतितास इतकी स्पीड पकडू शकते. या बॅटरीवर कंपनीकडून आठ वर्षांची वॉरंटी दिली जाते.
कंपनीने ही इलेक्ट्रिक क्विड ब्राझीलमध्ये 99,990 रियाल या किंमतीत सादर केली आहे, जी भारतीय चलनात सुमारे 16 लाख रुपयांच्या आसपास आहे.
रेनॉ कंपनीने भारतातही क्विडच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँचपूर्वी या कारला टेस्टिंगदरम्यान पाहिले गेले आहे. अशी अपेक्षा आहे की भारतात ही इलेक्ट्रिक क्विड 2026 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत बाजारात दाखल होऊ शकते.