फोटो सौजन्य: iStock
अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींच्या कार कलेक्शनमध्ये आपल्याला बीएमडब्ल्यूच्या कार्स पाहायला मिळतात. नुकतेच BMW ने त्यांचा लोगो कोणतीही मोठी घोषणा न करता अपडेट केला आहे.
Royal Enfield Hunter 350 vs Goan Classic 350: दोन्ही बाईकमध्ये एकच इंजिन मग फरक कशात?
बीएमडब्ल्यूने कोणतीही अधिकृत घोषणा न करता शांतपणे त्यांचा गोलाकार लोगो अपडेट केला आहे. हा नवीन लोगो पहिल्यांदा सप्टेंबर 2025 मध्ये iX3 मॉडेलवर सादर करण्यात आला होता. आता, ब्रँड फेब्रुवारीपासून त्यांच्या सर्व कारवर कंपनी हा नवीन लोगो वापरणार आहे. हे बदल खूपच किरकोळ आहेत, रंग आणि टेक्सचरमध्ये छोटेसे बदल करण्यात आले आहेत.
नवीन BMW लोगोमध्ये निळ्या आणि पांढऱ्या भागांना वेगळे करणाऱ्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल क्रोम बार आता काढून टाकण्यात आले आहेत. अपडेटेड लोगोमध्ये उरलेला क्रोम भाग आता स्मोक्ड (धूसर) लुकमध्ये दिसतो, ज्यामुळे त्याचा मॉडर्न लुक अधिक ठळक होतो. तसेच ‘BMW’ मधील स्वतंत्र अक्षरे आता अधिक स्लिम करण्यात आली असून, काळ्या भागावर आधीप्रमाणे ग्लॉसी फिनिशऐवजी सॅटिन किंवा मॅट फिनिश देण्यात आला आहे.
BMW च्या ब्लॉगमध्ये ब्रँडचे डिझाइन हेड ओलिव्हर हीलमर यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे, “आम्हाला वारसा जंपन्यासोबतच लोगो अधिक अचूक आणि सुस्पष्ट करायचा होता. क्रोम अजूनही आहे, मात्र अक्षरांमध्ये चमकदार पॅटर्न जोडण्यात आला आहे, जो सहसा घड्याळांमध्ये पाहायला मिळतो. पांढरे भाग आता बाहेरील रिंगच्या अधिक जवळ आहेत. लोगो फ्लॅट दिसतो, मात्र स्पर्श केल्यावर त्यातील उभार जाणवतो.”
परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी
नवीन लोगो सध्या काही युरोपीय डीलरशिप्समध्ये उपलब्ध झाला असून, तो सध्याच्या मॉडेल्सशी पूर्णपणे जुळेलच असे नाही. BMW ने स्पष्ट केले आहे की हा नवीन गोल लोगो हुडवर लावण्यात येईल, मात्र ट्रंक/टेलगेट, व्हील सेंटर कॅप किंवा स्टीयरिंग व्हीलवर तो वापरला जाईल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
BMW आपल्या M परफॉर्मन्स लोगोमध्येही बदल करण्याच्या तयारीत असून, हा अपडेट फेब्रुवारीपासून वाहनांवर दिसू लागेल. कंपनीकडून इतर काही बदलांबाबत सध्या तपशील जाहीर करण्यात आलेले नसले तरी, नवीन लोगो पाहता हा देखील एक सूक्ष्म डिझाइन अपडेट असण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2020 मध्ये BMW ने नवीन लोगो सादर केला होता, जो 1997 पासून वापरात असलेल्या लोगोसोबत समांतरपणे वापरला जात होता. तसेच 2017 मध्ये ब्रँडने आपल्या प्रीमियम मॉडेल्ससाठी ब्लॅक-अँड-व्हाइट लोगोही सादर केला होता.






