
फोटो सौजन्य: Pinterest
एमजी मोटर्स इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एमजी विंडसर ईव्ही ऑफर करते. या महिन्यात या कारवर हजारो रुपयांची सूट मिळत आहे. ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतींचा समावेश आहे. या महिन्यात या कारच्या कोणत्या व्हेरिएंटवर किती बचत मिळू शकते, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
रिपोर्टनुसार, या कारचा बेस व्हेरिएंट म्हणून 38 kWh बॅटरी व्हेरिएंट उपलब्ध आहे. या महिन्यात हा व्हेरिएंट खरेदी केल्यास एकूण 65 हजार रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. यामध्ये 30 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट, 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस समाविष्ट आहे.
53 kWh बॅटरीसह कारचे Pro व्हेरिएंट्स ऑफर केले जातात. या व्हेरिएंट्सवर कंपनीकडून एकूण 30 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. यात 20 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस समाविष्ट आहे.
कंपनीकडून ही कार भारतात 12.65 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर केली जात आहे. 38 kWh व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 17.73 लाख रुपयांपर्यंत आहे. तर Pro व्हेरिएंट्सची एक्स-शोरूम किंमत 18.73 लाख रुपये ते 19.34 लाख रुपयांदरम्यान आहे.
प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने खरेदी केली त्यांची ड्रीम कार! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही
महत्वाची सूचना: ही डिस्काउंट ऑफर तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते. त्यामुळे जवळील शोरूमला भेट देऊन या ऑफरबद्दल जाणून घ्या.