फोटो सौजन्य: Pinterest
भारतात होंडाने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने त्यांच्या एसयूव्ही, होंडा एलिव्हेटच्या किमतीत वाढ केली आहे. चला जाणून घेऊयात, या कारच्या कोणत्या व्हेरिएंटची किंमत किती रुपयांनी वाढली आहे.
प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने खरेदी केली त्यांची ड्रीम कार! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही
होंडा एलिव्हेट ही मिड साइझ एसयूव्ही म्हणून ऑफर केली जाते. कंपनीने जानेवारी 2026 मध्ये या एसयूव्हीची किंमत वाढवली आहे. रिपोर्टनुसार, वाढलेली किंमत तात्काळ लागू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या SUV च्या किमतीत कंपनीकडून कमाल 60 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीची घोषणा कंपनीने आधीच डिसेंबर 2025 मध्ये केली होती.
Honda Elevate SUV चा बेस व्हेरिएंट म्हणून SV ऑफर केली जाते. या व्हेरिएंटच्या मॅन्युअल ट्रान्समिशनच्या किमतीत 60 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर SV व्हेरिएंटच्या CVT ट्रान्समिशनच्या किमतीत 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
Royal Enfield Classic 350 vs Yezdi Roadster: कोणती बाईक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट? जाणून घ्या
SUV चा टॉप व्हेरिएंट म्हणून ZX ब्लॅक उपलब्ध आहे. या व्हेरिएंटच्या किमतीत 10 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ मॅन्युअल आणि CVT दोन्ही ट्रान्समिशन पर्यायांवर लागू आहे.
दरवाढीनंतर मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या बेस व्हेरिएंटची नवी एक्स-शोरूम किंमत 11.60 लाख रुपये झाली आहे. त्याच ट्रान्समिशनसह V व्हेरिएंटची किंमत 12.60 लाख रुपये, VX व्हेरिएंटची किंमत 13.75 लाख रुपये, ZX व्हेरिएंटची किंमत 14.98 लाख रुपये आणि ZX ब्लॅक व्हेरिएंटची किंमत 15.07 लाख रुपये झाली आहे.
CVT ट्रान्समिशन असलेल्या बेस व्हेरिएंटची नवी एक्स-शोरूम किंमत 13.22 लाख रुपये आहे. तर VX व्हेरिएंटची किंमत 14.91 लाख रुपये, ZX व्हेरिएंटची किंमत 16.16 लाख रुपये आणि ZX ब्लॅक व्हेरिएंटची किंमत 16.25 लाख रुपये झाली आहे.






