फोटो सौजन्य: Instagram
प्रथमेश आणि मुग्धा यांच्या प्रेमकथेची सुरुवात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमापासून झाली. या शोमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. त्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी एकत्र सहभाग घेतला, तसेच अनेक स्टेज शोही सोबत केले. या प्रवासात दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात बदलत गेली. अखेर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देत डिसेंबर 2023 मध्ये लग्न केले. नुकतेच ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागील कारण म्हणजे त्यांनी खरेदी केलेली नवीन कार.
Fortuner च्या पाठोपाठ आता Toyota ची ‘ही’ कार देखील महागली! 48,000 रुपयांपर्यंत केली वाढ
प्रथमेश-मुग्धाने त्यांची ड्रीम कार खरेदी केली आहे. ही कार म्हणजे Toyota Innova Crysta. माहितीनुसार, त्यांनी इनोव्हा क्रिस्टाचा ZX व्हेरिएंट खरेदी केला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवर शेअर केला आहे. प्रथमेशने पोस्टमध्ये लिहिले की मी सुरुवातीपासून टोयोटाचा मोठा फॅन राहिलो आहे! आता आम्ही आमच्या आणखी एक इनोव्हा क्रिस्टाचे एकत्र स्वागत करीत आहोत!
टोयोटाने जानेवारी 2026 मध्ये इनोव्हा क्रिस्टाच्या ZX आणि VX व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या आहेत, ज्यामुळे त्यांची किंमत 19.99 लाखांवरून 27.08 लाख (एक्स-शोरूम) रुपये झाली आहे.
ही MPV अद्याप 2.4-लिटर डिझेल इंजिनसह उपलब्ध असून ते 147 एचपी पॉवर आणि 343 एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
Royal Enfield Classic 350 vs Yezdi Roadster: कोणती बाईक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट? जाणून घ्या
ZX टॉप व्हेरिएंटमध्ये 8-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, Apple CarPlay/Android Auto सपोर्ट असलेली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, क्रूझ कंट्रोल तसेच 6 एअरबॅग्स, ABS, EBD आणि VSC यांसारखी अनेक सेफ्टी फीचर्स मिळतात.
आकर्षक लुक आणि आरामदायक रायडसाठी ही MPV ओळखली जाते. विशेषतः कुटुंबीयांसह प्रवास आणि पर्यटनासाठी ती एक उत्तम पर्याय मानली जाते.






