फोटो सौजन्य: @carleloindia (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे नेहमीच जागातील अनेक ऑटो कंपन्यांना नेहमी खुणावत असते. म्हणूनच तर अनेक वर्षांपासून विदेशी ऑटो कंपन्या देशात ग्राहकांच्या मागणीनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. नुकतेच स्कोडा या युरोपियन ऑटोमोबाईल कंपनीने भारतात आपली नवीन कार लाँच केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
दुसऱ्या जनरेशनमधील 2025 Skoda Kodiaq भारतात लाँच करण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच, नवीन स्कोडा कोडियाक पूर्णपणे भारतात असेंबल केली आहे. यात अनेक फीचर्ससह पूर्णपणे नवीन इंटिरिअर आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली इंजिन आहे. 2025 च्या स्कोडा कोडियाकमध्ये काय नवीन बदल करण्यात आले आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
‘या’ Electric Car चा जगभरात डंका ! मिळवला World Car of the Year चा पुरस्कार
ही नवीन स्कोडा कोडियाक दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच्या स्पोर्टलाइन ट्रिमची किंमत 46.89 लाख रुपये, (एक्स-शोरूम) आहे आणि लॉरिन अँड क्लेमेंट (L&K) ट्रिमची किंमत 48.69 लाख रुपये, (एक्स-शोरूम) आहे.
2025 ची स्कोडा कोडियाक मागील जनरेशनपेक्षा अधिक गोलाकार दिसते. या कारचा स्प्लिट हेडलॅम्प पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. यात एक नवीन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प सिग्नेचर आहे, जो ग्रिलपर्यंत पसरलेला आहे. त्याच्या बंपरवर फंक्शनल एअर व्हेंट्स आहेत, ज्यामुळे बोनेटवर चांगले पॉवर बल्ज देखील आहेत.
या कारचा व्हीलबेस पूर्वीसारखाच आहे, पण तो थोडा लांब आहे. त्याच्या एल अँड के ट्रिममध्ये 8-इंच अलॉय व्हील्ससाठी एक नवीन एरो-ऑप्टिमाइज्ड लूक आणि डी-पिलरसाठी कॉन्ट्रास्टिंग फिनिश आहे. स्पोर्टलाइन ट्रिममध्ये ग्रिल, विंग मिरर, डी-पिलर गार्निश आणि मागील बंपरसाठी ब्लॅक-आउट फिनिश आहे. यात 18-इंच अलॉय देखील आहेत, ज्यांना अधिक स्पोर्टी डिझाइन देण्यात आले आहे.
भारतीयांची आवडती Toyota Innova खरेदी करण्यासाठी किती असावा पगार, जेणेकरून दरमहा EMI भरावा लागेल
2025 च्या स्कोडा कोडियाकच्या इंटिरिअरला पूर्णपणे नवीन लूक देण्यात आला आहे. यात 13-इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एचव्हीएसी कंट्रोल्ससाठी तीन फिजिकल डायल, नेव्हिगेशन फीडसह नवीन 10-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, दोन-स्पोक स्टीअरिंग व्हील यांचा समावेश आहे. त्याच्या मागील सीट्स पुढे आणि मागे सरकवता येतात आणि त्यांना रिक्लाइन फंक्शन देखील मिळते.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, नवीन स्कोडा कोडियाकमध्ये 9 एअरबॅग्ज, ईएससी, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक, मल्टी-कोलिजन ब्रेक, ड्रायव्हर अटेंशन आणि स्लीप मॉनिटर आणि डिसेंट कंट्रोलसह हिल स्टार्ट असिस्ट सारख्या दमदार सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.
2025 स्कोडा कोडियाकमध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 204 एचपी आणि 320 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन पूर्वीपेक्षा 14 एचपी जास्त पॉवर देते. त्याचे इंजिन 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. नवीन स्कोडा कोडियाकबद्दल, कंपनीचा दावा आहे की ती ARAI-रेटेड मायलेज 14.86 किलोमीटर प्रति लिटर देते.