फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ
ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचे लॉंचिग कंपन्यांकडून केले जात आहे. या काळातच ग्राहक मोठ्या प्रमाणात वाहन खरेदीकडे वळत असल्याने कंपन्या आपल्या मॉडेल्स विशेषत: या कालावधीमध्ये लॉंच करतात. बजाजकडूनही त्यांच्या सर्वात गाजलेला बाईक ब्रॅंड पल्सरची नवीन एडिशन बाजारात आणली आहे. Bajaj Pulsar N125- ही सर्वात लहान N सीरीजची बाईक भारतात लाँच झाली आहे. या बाईकच्या बेस व्हेरिएंटची किंमत 94,707 रुपयांपासून सुरू होते तर बाईकच्या ब्लूटूथ व्हेरिएंटची किंमत 98,707 रुपये आहे.
बजाज पल्सर N125 इंजिन (Bajaj Pulsar N125)
बजाज पल्सर N125 मध्ये 124.58cc, सिंगल-सिलेंडर मोटर आहे जी एअर-कूल्ड आहे. बजाजची ही 5वी 125cc मोटरसायकल आहे. नवीन 125cc इंजिन 8500 rpm वर 12hp ची कमाल पॉवर आणि 6000rpm वर 11Nm टॉर्क देते. बाईकच्या इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.
बजाज पल्सर N125 इतर बाबी (Bajaj Pulsar N125)
बाईकला सिंगल-क्रेडल फ्रेम मिळते. बाईकमध्ये बॅक सस्पेंशन मोनोशॉक आहेत. फ्रंट डिस्क 240mm आणि 130mm मागील ड्रम ब्रेक आहे. टायर प्रोफाईलबद्दल विचार केल्यास, आम्हाला समोर 80/100-17 आणि मागील बाजूस 100/90-17 या आकाराचे टायर मिळतात. पलसर एन 125 च्या टॉप व्हेरियंटचा विचार केल्यास, ब्लूटूथ व्हेरियंटला मागील बाजूस 110/80-17 टायर मिळतो. टाकीची क्षमता 9.5-लिटर आहे आणि Pulsar N125 चे वजन 125kg आहे. बाईकच्या सीटची उंची 795mm आहे. ग्राउंड क्लीयरन्स 198 मिमी आहे आणि एक्झॉस्ट अंडरबेली आहे.वैशिष्ट्यांचा विचार केल्यास, मोटरसायकलला बेसिक ब्लूटूथ एलसीडी डिस्प्लेसह एलईडी हेडलाइट मिळतो. टॉप व्हेरियंटला खूप मोठा डॅश आणि एक जाड रियर टायर मिळतो. स्प्लिट सीट कॉन्फिगरेशन मिळते.
बजाज पल्सर N125 रंग पर्याय (Bajaj Pulsar N125)
बजाज पल्सर N125 ही चार रंग पर्यायामध्ये उपलब्ध आहे – त्यामध्ये पांढरा, काळा, लाल आणि निळा या रंगांचा समावेश आहे. तर, ब्लूटूथ प्रकारामध्ये तीन ड्युअल-टोन पर्याय मिळतात- ज्यामध्ये काळा/लाल, काळा/पिवळा आणि काळा/जांभळा यांचा समावेश आहे.
बजाज पल्सर N125 पलसर बाईकमध्ये एक नवे एडिशन लॉंच झाले आहेच त्याशिवाय या प्रकारामध्ये ग्राहकांना नवीन बाईक पर्याय उपलब्ध झाला आहे.