Odysse Sun इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच (फोटो सौजन्य: Social Media)
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत दमदार वाढ होत आहे. यातही इलेक्ट्रिक दुचाक्यांना चांगली मागणी मिळतेय. तसेच, सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस विविध योजना आणि सबसिडीमार्फत प्रोत्साहित करत आहे. अशातच आता मार्केटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाली आहे, जी बजेट फ्रेंडली किमतीत उत्तम रेंज देत आहे. चला या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल जाणून घेऊयात.
Odysse Electric Vehicles ने भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात त्यांची नवीन हाय-स्पीड ई-स्कूटर Odysse Sun लाँच केली आहे. ही स्कूटर दोन बॅटरी पर्यायांसह येते. पहिला 1.95 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक आहे ज्याची किंमत 81,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि दुसरा 2.9k किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक आहे ज्याची किंमत 91,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. मोठा बॅटरी प्रकार एका चार्जवर १३० किमी पर्यंतची रेंज देतो, तर स्कूटरचा टॉप स्पीड 70 किमी/तास आहे.
Vinfast आणणार Nano पेक्षाही सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार, MG Comet चे टेन्शन वाढणार
कंपनी ही स्कूटर शहर-केंद्रित इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून लाँच करण्यात आली आहे, जी परफॉर्मन्स, कम्फर्ट आणि सुविधेचे चांगले कॉम्बिनेशन आहे. ज्याची डिझाइन प्लस-साईज एर्गोनॉमिक आहे, जी बसण्यासाठी कम्फर्ट देते . Odysse Sun चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे (पॅटिना ग्रीन, गनमेंटल ग्रे, फँटम ब्लॅक आणि आइस ब्लू).
ओडिसी सनमध्ये एलईडी लाइटिंग आणि एव्हिएशन-ग्रेड सीट्स आहेत, ज्यामुळे लांब प्रवास देखील आरामदायी होतो. त्यात ३२ लिटर अंडर सीट स्टोरेज स्पेस आहे, जी Ola S1 Air (34L) पेक्षा थोडी कमी आणि Ather Rizta (22L) पेक्षा जास्त आहे.
स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि हायड्रॉलिक मल्टी-लेव्हल ॲडजस्टेबल रिअर शॉक अॅब्झॉर्बर्स आहेत, जे खराब रस्त्यांवरही सहज प्रवास सुनिश्चित करतात. ब्रेकिंगसाठी, त्यात फ्रंट आणि रियर दोन्ही डिस्क ब्रेक आहेत. याशिवाय, कीलेस स्टार्ट-स्टॉप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डबल फ्लॅश रिव्हर्स लाईट आणि तीन रायडिंग मोड (ड्राइव्ह, पार्किंग, रिव्हर्स) देखील उपलब्ध आहेत.
Toyota Urban Cruiser Taisor चे अपडेटेड व्हर्जन सादर, आता अनुभवा अधिक सुरक्षित प्रवास
ओडिसी सनचा मोठा बॅटरी व्हेरिएंट तुम्हाला 130 किमी पर्यंतची रेंज देऊ शकतो, ज्यामुळे ही स्कूटर दैनंदिन प्रवासासाठी एक उत्तम पर्याय बनते. त्याचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे, जो शहरात जलद आणि सुरक्षित रायडिंगसाठी चांगला आहे.
Odysse Sun ओला आणि Ather सारख्या ब्रँडशी स्पर्धा करू शकते. हे ब्रँड अधिक हाय-टेक फीचर्स देतात, परंतु ओडिसी सन त्याच्या साधेपणा, अधिक जागा आणि परवडणाऱ्या किमतीसह या कंपन्यांना चांगली स्पर्धा देईल.