फोटो सौजन्य: @ToyotaRajesh (X.com)
ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाशी बांधील राहून आणि सर्वोत्तम कार अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही अर्बन क्रूझर टायसरमध्ये दोन महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्व व्हेरिएंट्समध्ये आता प्रमाणित सहा एअरबॅग्जचा समावेश आणि निवडक व्हेरिएंट्समध्ये नवीन ‘ब्ल्युइश ब्लॅक’ एक्स्टिरिअर रंगाची भर घालण्यात आली आहे. किंमत ७.७७ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
टायसरच्या गतीशील आणि आकर्षक डिझाइनला आणखी उठाव देण्यासाठी टीकेएमने ‘ब्ल्युइश ब्लॅक’ रंग सादर केला आहे. हा शेड वाहनाच्या रस्त्यावरच्या उपस्थितीला अधिक लक्षवेधक बनवतो आणि ग्राहकांना स्पोर्टी लुकसह एक आकर्षक पर्याय देतो. हा बदल कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदीदारांच्या वैयक्तिकरणाच्या वाढत्या मागणीचा विचार करून करण्यात आला आहे.
अरे ही खरंच बाईक आहे का? Ola कडून इलेक्ट्रिक बाईक Diamondhead चा टिझर प्रदर्शित
सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी सुधारणा करत, आता अर्बन क्रूझर टायसरच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये सहा एअरबॅग्ज प्रमाणित म्हणून उपलब्ध आहेत. यात ड्युअल फ्रंट, दोन साइड आणि दोन कर्टन एअरबॅग्जचा समावेश असून विविध ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये प्रवाशांना सर्वांगीण संरक्षण मिळते. या अपडेटमुळे ई, एस, एस+, जी आणि व्ही अशा सर्व श्रेणींमध्ये सुरक्षिततेचा उच्च दर्जा सुनिश्चित झाला आहे.
टायसरमध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत – १.२ लिटर के-सिरीज पेट्रोल इंजिन आणि १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन. हे मॉडेल जवळपास २२.७९ किमी/लीटरचा अपवादात्मक मायलेज देते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ५एमटी, ५एएमटी आणि ६एटी यांचा समावेश आहे, जे विविध ड्रायव्हिंग स्टाईलसाठी उपयुक्त ठरतात.
बाहेरील डिझाइनमध्ये स्लिक एलईडी हेडलॅम्प्स, ट्विन एलईडी डीआरएल, क्रोम अॅक्सेंटसह सिग्नेचर ट्रॅपेझॉइडल ग्रिल देण्यात आली आहे. आतील बाजूस प्रीमियम ड्युअल-टोन केबिन, ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स, रिअर एसी वेंट्स आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्ले असलेले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
टायसरमध्ये क्रूझ कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स (एटी व्हेरिएंटमध्ये), वायरलेस चार्जिंग, तसेच टोयोटा आय-कनेक्टसह स्मार्टवॉच व व्हॉइस असिस्टंट सुसंगतता आहे. यामुळे प्रत्येक प्रवास अधिक आरामदायी व कनेक्टेड होतो.
सहा एअरबॅग्जशिवाय, टायसरमध्ये व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC), हिल होल्ड असिस्ट, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि इतर प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
अर्बन क्रूझर टायसर ३ वर्षे / १,००,००० किमी वॉरंटीसह येते, जी ५ वर्षे / २,२०,००० किमीपर्यंत वाढवता येते. तसेच टोयोटाची एक्सप्रेस मेंटेनन्स सर्विस आणि २४x७ रोडसाइड असिस्टन्स सुविधाही उपलब्ध आहे.