
फोटो सौजन्य: Pinterest
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता कंपनी या एसयूव्हीची नवी जेनरेशन लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यापूर्वीच ही कार पहिल्यांदाच टेस्टिंगदरम्यान दिसून आली आहे. याबाबत कोणती माहिती समोर आली आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
वेळ आलीये! Tesla ‘या’ 2 मॉडेल कायमचे बंद करण्याच्या तयारीत, जाणून घ्या कारण
मीडिया रिपोर्ट्सनुसार Hyundai कडून Creta च्या नव्या जेनरेशनवर काम सुरू झाले आहे. कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, ही एसयूव्ही पहिल्यांदाच टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावर Shorts Car हँडलवर या एसयूव्हीचे फोटो शेअर करण्यात आले असून त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही एसयूव्ही दक्षिण कोरिया येथे टेस्टिंगदरम्यान पहिल्यांदाच स्पॉट करण्यात आली आहे. यावरून पुढील काही वर्षांत या एसयूव्हीची 3rd जनरेशन बाजारात आणली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेस्टिंगदरम्यान दिसलेली युनिट पूर्णपणे कव्हर केलेली होती. मात्र, सध्याच्या जेनरेशनच्या तुलनेत नव्या जेनरेशनमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये एसयूव्हीची लांबी आणि रुंदी वाढवली जाऊ शकते. तसेच नवीन डिझाइनच्या LED लाईट्स, अपडेटेड बंपर देण्यात येऊ शकतात. ही कार SX3 कोडनेमसह टेस्ट करण्यात येत आहे.
कंपनी भारतात ही एसयूव्ही लाँच करताना सध्याच्या इंजिन पर्यायांसोबत हायब्रिड टेक्नॉलॉजीचाही समावेश करू शकते. सध्याच्या जेनरेशनमध्ये 1.5 लीटर पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत.
Hyundai कडून नव्या जेनरेशन Creta बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार ही एसयूव्ही 2027 पर्यंत ग्लोबल बाजारासह भारतातही सादर केली जाऊ शकते.