(फोटो सौजन्य-AI एआय)
या अपडेटमध्ये सर्वात मोठा बदल इंजिन-गिअरबॉक्सच्या बाबतीत करण्यात आला आहे. 1.0-लिटर, 3-सिलेंडर टीएसआय पेट्रोल इंजिनसोबत आता नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळणार आहे. याआधी या इंजिनसोबत 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला जात होता. त्यामुळे शहरातील ड्रायव्हिंगसोबत लांबच्या प्रवासातही ड्रायव्हिंग अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.
JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
नव्या स्लाव्हियाच्या केबिनमध्येही मोठे अपग्रेड करण्यात आले आहेत. मागच्या सीटसाठी मसाज फंक्शन देण्यात आले असून, या सेगमेंटमधील हे विशेष फीचर ठरते. याशिवाय 360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा देण्यात आला आहे. इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये गुगल क्लाउडवर आधारित एआय कंपॅनियनचा समावेश करण्यात आला आहे.
फीचर्सनुसार वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन, कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळणार आहे. निवडक व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्सही मिळतील. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ससह 25 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. कारला ग्लोबल एनकॅपकडून मिळालेले 5-स्टार सेफ्टी रेटिंग कायम आहे.
डिझाइनमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. नवीन एलईडी हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स, अपडेटेड एलईडी टेललॅम्प्स आणि सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स मिळतात. टॉप-एंड मॉन्टे कार्लो व्हेरिएंटमध्ये रेड डिटेलिंग, रेड ब्रेक कॅलिपर्स आणि खास अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
नव्या स्लाव्हियाचे उत्पादन सुरू झाले असले तरी स्कोडाने अद्याप व्हेरिएंटनुसार फीचर्स आणि अधिकृत किंमती जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे लॉन्चच्या वेळी या सेडानची किंमत आणि नेमके कोणते फीचर्स कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळतात, याकडे ग्राहकांचे लक्ष असेल.






