(फोटो सौजन्य-AI एआय)
निसान मोटर इंडियाने मॅग्नाइट आणि ग्रॅवाइट या 2 कारवर फेस्टिव्ह सीझनसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये निवडक व्हेरिएंट्सवर CNG रेट्रोफिटमेंटचा खर्च माफ केला जाणार आहे. मॅग्नाइटसाठी 74,999 रुपये, तर ग्रॅवाइटसाठी 85,999 रुपयांचा फायदा मिळणार आहे. ही ऑफर 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे पेट्रोलसोबत CNG चा ऑप्शन शोधणाऱ्या कस्टमर्सना कारच्या खर्चात बचत करण्याची संधी मिळणार आहे.
निसान ग्रॅवाइटमध्ये ट्विन-सिलेंडर CNG सेटअप देण्यात आला आहे. यात प्रत्येकी 25 लिटर कॅपसिटीचे 2 सिलेंडर बसवले आहेत. या रचनेमुळे कारची 7-सीटर बैठक व्यवस्था कायम ठेवण्यास मदत होते. नेहमीच्या मोठ्या सिंगल सिलेंडरऐवजी 2 सिलेंडर वापरल्याने मागच्या भागातील जागेचा वापरही सोयीस्कर होतो. ग्रॅवाइटसाठी हे CNG किट मे 2026 मध्ये 82,999 रुपयांना सादर करण्यात आले होते. सध्या त्याची लिस्टेड किंमत 85,999 रुपये आहे.
या दोन्ही कारसाठी CNG रेट्रोफिटमेंट सिस्टीम मोटोझेनने विकसित केली असून तिचे प्रोडक्शन आणि क्वालिटी तपासणीही कंपनीकडून केली जाते. ग्रॅवाइटमधील सिस्टीम BS6.2 नियमांनुसार तयार करण्यात आली आहे आणि तिला ICAT प्रमाणपत्र मिळाले आहे. यात 8.1 mm जाडीचे सिलेंडर आणि Dynamic Advancer टेक्नोलॉजी दिली आहे. CNG फिलर कारच्या फ्युल लिडखाली बसवण्यात आला आहे. चालकाला पेट्रोल आणि CNG मोडमध्ये स्विच करता येते.
मॅग्नाइटसाठी ही ऑफर निवडक नॉन-टर्बो व्हेरिएंट्सवर लागू आहे. Visia MT, Visia EZ-Shift आणि Visia + MT या व्हेरिएंट्सना याचा लाभ मिळणार नाही. ग्रॅवाइटमध्ये Tekna व्हेरिएंटसाठी 85,999 रुपयांचा फायदा दिला जात आहे. दोन्ही मॉडेल्सच्या CNG किटवर 3 वर्षे किंवा 1,00,000 km ची थर्ड पार्टी वॉरंटी मिळते. ही वॉरंटी कारच्या स्टँडर्ड वॉरंटीव्यतिरिक्त आहे.
ग्रॅवाइटचे CNG किट 16 राज्यांमधील 60 शहरांत निसान डीलर्सकडून बसवता येते. मॅग्नाइटच्या रेट्रोफिटमेंट किंमतीत किट, सिलेंडर इन्स्टॉलेशन, CNG गॅस, RTO आणि इन्शुरन्स एंडोर्समेंट तसेच थर्ड पार्टी वॉरंटीचा खर्च समाविष्ट आहे. सध्या मॅग्नाइटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.69 लाख रुपये, तर ग्रॅवाइटची किंमत 5.73 लाख रुपये आहे.
Ans: निसान मॅग्नाइटसाठी CNG रेट्रोफिटमेंटचा 74,999 रुपयांचा खर्च माफ केला जाणार आहे.
Ans: ग्रॅवाइटमध्ये प्रत्येकी 25 लिटर कॅपसिटीचे 2 सिलेंडर दिले आहेत. यामुळे 7-सीटर बैठक व्यवस्था कायम ठेवता येते.
Ans: ही ऑफर 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू आहे. मॅग्नाइट आणि ग्रॅवाइटच्या निवडक व्हेरिएंट्सनाच याचा लाभ मिळणार आहे.






