Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात निसानचा धमाका! सिल्व्हर ज्युबिली ३एस सुविधेचे दिमाखात उद्घाटन, एकाच छताखाली विक्री, सेवा आणि स्पेअर पार्ट मिळणार

मुंबईत निसानने त्यांचे नवीन शोरूम आणि सर्व्हिस सेंटर सुरु केल्यानंतर आता कंपनीने त्यांचा विस्तार पुण्यात देखील वाढवला आहे. कंपनीने पुण्यात अत्याधुनिक 3S (Sales, Service, Spare Parts) सुविधेचे उद्घाटन केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 08, 2026 | 06:57 PM
पुण्यात निसानचा धमाका! सिल्व्हर ज्युबिली ३एस सुविधेचे दिमाखात उद्घाटन, एकाच छताखाली विक्री, सेवा आणि स्पेअर पार्ट मिळणार
Follow Us
Follow Us:

Nissan Motor India ने महाराष्ट्रातील आपले नेटवर्क आणखी मजबूत करत Pune येथे अत्याधुनिक 3S (Sales, Service, Spare Parts) सुविधेचे उद्घाटन केले आहे. ‘सिल्व्हर ज्युबिली निसान’ नावाच्या या नव्या केंद्रामुळे ग्राहकांना विक्री, सेवा आणि सुटे भाग या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

या नव्या सुविधेत सुमारे 7000 चौ. फुटांचे आधुनिक शोरूम असून येथे एकावेळी 10 गाड्यांचे प्रदर्शन करता येते. तसेच 9000 चौ. फुटांचे अत्याधुनिक सर्व्हिस वर्कशॉप देखील तयार करण्यात आले आहे. कंपनीच्या जागतिक रिटेल मानकांनुसार विकसित करण्यात आलेल्या या केंद्रात प्रशिक्षित कर्मचारी आणि आधुनिक उपकरणांच्या मदतीने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे.

जगातील सर्वात लांब कार पाहिलीत का? 100 फूट लांब, हेलिपॅड आणि स्विमिंग पूलसह 75 लोक बसतील एवढी जागा

या विस्तारामुळे महाराष्ट्रातील निसानचे नेटवर्क 23 टचपॉइंट्सपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभ सेवा, जलद प्रतिसाद आणि दर्जेदार आफ्टर-सेल्स सपोर्ट मिळणार आहे. वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी कंपनीकडून हा विस्तार करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक Saurabh Vatsa म्हणाले, “पुण्यातील या नव्या 3S सुविधेमुळे महाराष्ट्रातील आमची उपस्थिती अधिक भक्कम झाली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही सतत नेटवर्क विस्तारावर भर देत आहोत. यामुळे वाहन खरेदीचा आणि सेवांचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल.”

सिल्व्हर ज्युबिली निसानच्या मुख्य वितरक Rajvardhini Jagtap यांनीही सांगितले की, “निसानच्या ग्राहककेंद्री दृष्टिकोनामुळे आम्ही पुणे आणि आसपासच्या भागातील ग्राहकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

ग्राहकांनोsss ही संधी सोडू नका! 27kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ कारवर 1.80 लाख रुपयांचे डिस्काउंट, Honda ची मोठी घोषणा

दरम्यान, Nissan Magnite च्या यशानंतर कंपनीने Nissan Gravite सादर करत भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत केली आहे. निसान मोटर इंडिया सध्या देशांतर्गत बाजारासह 65 हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कार्यरत असून भारतातील आघाडीच्या वाहन निर्यातदारांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

ग्राहकांना अधिक मूल्य आणि उत्तम सेवा देण्यासाठी निसानकडून भविष्यातही अशा विस्तार उपक्रमांना गती दिली जाणार असल्याचे संकेत कंपनीने दिले आहेत.

Web Title: Nissan opens silver jubilee 3s facility in pune sales service spares under one roof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • nissan

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
3

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.