फोटो सौजन्य: Pinterest
या महिन्यात Honda City वर दमदार ऑफर्स मिळत आहेत. जुन्या स्टॉक (MY2025) वर तब्बल 1.80 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर 2026 च्या नवीन मॉडेलवर सुमारे 35,000 रुपयांची सूट मिळते. याशिवाय, कोणत्याही व्हेरिएंटच्या खरेदीवर कंपनीकडून 7 वर्षांची अपघात वॉरंटीही दिली जात आहे.
Mahindra च्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! फटाफट 20 हजार युनिट्स सोल्ड आऊट
Honda City चे डिझाइन आधुनिक आणि आकर्षक आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल, LED हेडलाइट्स, Z-शेप टेललाइट्स आणि स्पोर्टी बंपर देण्यात आले आहेत. कारची लांबी 4583 मिमी असून व्हीलबेस 2600 मिमी आहे, त्यामुळे ती मजबूत आणि प्रीमियम लुक देते. यामध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असून वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट दिला आहे.
तसेच सिंगल पेन सनरूफ, वायरलेस चार्जर, उत्तम साउंड सिस्टम आणि मागील सीटवर भरपूर लेगस्पेस यांसारख्या सुविधा देखील मिळतात.
या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असून ते दोन इलेक्ट्रिक मोटर्ससोबत काम करते. हा हायब्रिड सेटअप 126 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क निर्माण करतो. e-CVT ट्रान्समिशनमुळे ड्रायव्हिंग अनुभव अतिशय स्मूथ होतो. याचे मायलेज 27.13 ते 27.26 किमी/लिटर (ARAI) असून शहर आणि हायवे दोन्हीसाठी उपयुक्त आहे. फ्यूल टँक क्षमता 40 लिटर आहे.
क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स
Honda City Hybrid e:HEV ही एक प्रीमियम सेडान असून भारतात तिच्या ZX व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 19.99 लाख ते 20.50 लाख रुपयांदरम्यान आहे.






