मुकेश अंबानी नाही तर 'या' व्यक्तीकडे आहे देशातील सर्वात महाग कार, किमंत ऐकून येईल चक्कर
अंबानी कुटुंब सध्या खूप चर्चेत आहेते ते त्यांच्या घरातील लगिन सराईमुळे. नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चन्ट हे विवाहबंधनात अडकले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा उपस्थति होते. परंतु ज्याप्रमाणे या लग्नाची जेवढी चर्चा झाली त्याही पेक्षा जास्त चर्चा ही अंबानींकडे असलेल्या संपत्तीची होते. आणि याच संपत्तीत त्याच्या काही विशेष आणि लक्झरी कार्सचा देखील समावेश आहे.
अंबानी कुटुंबाकडे असंख्य महागड्या गाड्या आहेत, ज्यांची नावे तुम्ही ऐकलीही नसतील.पण तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात महागडी कार ही मुकेश अंबानींकडे नसून या व्यक्तीकडे आहे. कोण आहे ती व्यक्ती चला जाणून घेऊया.
अंबानी कुटुंबाकडे न जाणो कितीतरी महागड्या कार्स असतील, ज्याचे नावसुद्धा आपण कधी ऐकले नसेल. पण अंबानी कुटुंबातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे आणि त्या कारचे नाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तसेच, ती कार कोणत्या फीचर्सनी सुसज्ज आहे?
देशातील सर्वात महागडी कार उद्योगपती तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीची असेल, असे बहुतेकांना वाटणे शक्य आहे. पण ते तसे नाही. देशाती सर्वात महागडी कार ही मुकेश अंबानी यांच्याकडून नसून त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्याकडे आहे.
नीता अंबानी यांच्याकडे Audi A9 Chameleon नावाची कार आहे, जी संपूर्ण भारतातील सर्वात महागडी कार आहे. एका रिपोर्टनुसार या कारची किंमत तब्बल 90 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे विशेष वाहन सुमारे 600 हॉर्सपावरच्या दमदार इंजिनसह येते.
या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही बटन दाबून तिचा रंग बदलू शकता. होय, स्पॅनिश डिझायनर डॅनियल गार्की यांनी बनवलेली ही कार इलेक्ट्रॉनिक पेंट सिस्टमने सुसज्ज आहे. अशी केवळ 11 वाहने जगभरात विकली गेली आहेत आणि त्यापैकी एक नीता अंबानी यांच्या गॅरेजमध्ये आहे. त्याच वेळी, मुकेश अंबानी यांच्या मालकीची सर्वात महागडी कार BMW 760 Li Armoured आहे. हे बुलेटप्रूफ वाहन विशेष सुरक्षा फीचर्समुळे ओळखले जाते.