(फोटो सौजन्य-AI एआय)
ओबेन इलेक्ट्रिकने मे 2026 मध्ये Rorr Evo इलेक्ट्रिक मोटरसायकल ₹99,999 च्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत सादर केली होती. ही किंमत सुरुवातीच्या 10,000 कस्टमरसाठी लागू होती. विशेष म्हणजे Rorr Evo ला आतापर्यंत 25,000 पेक्षा जास्त बुकिंग्स मिळाल्या आहेत. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने उत्पादनाचा वेग वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
ओबेनची खासियत म्हणजे इलेक्ट्रिक बाइकसाठी लागणारे अनेक महत्त्वाचे पार्ट्स कंपनी स्वतः विकसित आणि तयार करते. LFP बॅटरी, मोटर, VCU, चार्जर आणि प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर यांचा यात समावेश आहे. बंगळुरूतील व्हर्टिकली इंटिग्रेटेड प्लांटमुळे उत्पादन प्रक्रियेवर कंपनीला जास्त नियंत्रण ठेवता येते. FY27 अखेरपर्यंत भारतात 200 एक्सक्लुझिव्ह शोरूम उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
Rorr Evo मध्ये 3.4 kWh LFP बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या माहितीनुसार या बॅटरीमध्ये पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत 50% जास्त हीट रेझिस्टन्स आणि 2 पट जास्त लाइफसायकल मिळते. बाइकला IP68 रेटिंग असलेली 9 kW इलेक्ट्रिक मोटर मिळते. ही मोटरही ओबेनने इन-हाउस विकसित केली आहे.
Triumph Scrambler 400 X पावर, पर्फोर्मंस आणि इंजिनाची A टू Z माहिती! जाणून घ्या
परफॉर्मन्सच्या बाबतीत Rorr Evo 0-40 kmph वेग फक्त 3 सेकंदांत पकडते. फुल चार्जमध्ये IDC रेंज 180 किमी असून टॉप स्पीड 110 kmph आहे. बाइकमध्ये 780 mm सीट हाइटसह 680 mm लांबीची सीट देण्यात आली आहे. तसेच या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा 10 लिटर स्टोरेज कॅपॅसिटी मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. Pulse Red, Neutron Blue, Magnetic Black आणि Photon White असे 4 रंगांचे ऑप्शन अव्हेलेबल आहेत.
देशातील टू-व्हीलर विक्रीत मोटरसायकलचा वाटा मोठा असला, तरी इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक मोटरसायकलची विक्री अजूनही कमी आहे. अशा परिस्थितीत 10,000 वी रॉर आणि Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा ओबेनसाठी महत्त्वाचा ठरत आहे.






