ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी घोषणा केली की, कंपनीच्या नव्या ‘इलेक्ट्रिक बाईक्स’ भारतात 2025 मध्ये पदार्पण करेल.ओलाच्या अलीकडील IPO वर चर्चा करण्यासाठी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली, जिथे अग्रवाल यांनी कंपनीच्या महत्त्वाकांक्षी गोष्टींवर प्रकाश टाकला. ओला इलेक्ट्रिक ही ओला एस१ प्रो, ओला एस१ एअर आणि ओला एस१एक्स या इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी ओळखली जाते, परंतु कंपनी आता इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये आपले स्थान प्राप्त करु इच्छिते.
अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार , पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात उपलब्ध होईल. आगामी मॉडेल्सची अधिक तपशीलवार माहिती 15 ऑगस्ट रोजी नियोजित कार्यक्रमात दिली जाईल. अग्रवाल यांनी सांगितले,” नवीन बाईकमध्ये ओला इलेक्ट्रिकनेच विकसित केलेल्या बॅटरी असतील. भारतीय इलेक्ट्रिक बाईकमध्ये दिसणाऱ्या या सर्वात मोठ्या बॅटरीपैकी एक असेल. 2025 पासून, आम्ही इन-हाउस डिझाइन केलेल्या EV बॅटरीचा वापर करू.”
भारत इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये जागतिक केंद्र
अग्रवाल पुढे म्हणाले, “पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत आमची इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्याची आमची योजना आहे. ईव्ही बाजाराचा विस्तार होत आहे, आणि आम्हाला मंदीची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आमचे ध्येय भारताला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एक आघाडीचे जागतिक केंद्र म्हणून स्थान देणे आहे,”
भारतामध्ये सध्या इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरामध्ये कमालीची वाढ दिसते आहे. सरकारकडूनही इलेक्ट्रीक वाहनांना अनुदान दिले जात आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक या वाहनांच्या किंमतीवर त्याचा परिणाम होतो ज्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. अनेक नवनवीन स्टार्ट अप इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीमध्ये येत आहेत. विशेषत: टू व्हीलर्समध्ये भारत हा इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचा हब बनू शकतो.