फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रीचा दहावा दिवस हा देवीच्या प्रस्थानाचा दिवस मानला जातो. या काळात भक्त नऊ दिवस देवीच्या रुपांची पूजा करतात आणि 9 दिवस वेगवेगळ्या गोष्टींचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र देवीला दहाव्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी दही आणि पोह्याचा नैवेद्य का दाखवला जातो. काय आहे यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे, जाणून घ्या
आज, गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी दुर्गा देवीच्या विसर्जनासाठी दोन शुभ मुहूर्त आहे. पहिला शुभ वेळ सकाळी होता. त्यानंतर, दुपारी 1.21 ते 3.44 पर्यंतचा वेळ देखील विसर्जनासाठी शुभ असेल.
दही आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवण्यामागील सर्वांत मोटे कारण म्हणजे हा एक थंडावा देणारा नैवेद्य आहे जो देवीला तिच्या जाण्याच्या वेळी दिला जातो. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी देवीला निरोप दिला जातो. अशा वेळी देवीला दही आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवणे खूप शुभ आणि फायदेशीर मानले जाते. दही हे शुभतेचे प्रतीक मानले जाते.
महिला दुर्गा देवीला कन्या मानतात म्हणून तिच्या निरोपाचा विधी पूर्ण करण्यासाठी तिला दही आणि पोह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. धार्मिक शास्त्रांनुसार, प्रवासादरम्यान दही खाणे लोकांसाठी खूप शुभ असते आणि प्रवासदेखील सोयीस्कर होतो, अशी मान्यता आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्या गेल्यास पचनासाठी देखील उपयुक्त आहे आणि शरीराला थंडावा देते. काही ठिकाणी महिला देवीला स्वतःच्या मुलीसारखे मानतात आणि दहाव्या दिवशी दही आणि पोहे घालून तिचे स्वागत करतात, जसे मुलगी घरातून निघते तेव्हा केले जाते.
रामायणानुसार, या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला बंदिवासातून मुक्त केले. ही घटना धार्मिकता आणि अधर्म यांच्यातील संघर्षाचे प्रतीक मानली जाते. म्हणूनच दसऱ्याला रावण दहन करण्याची परंपरा आहे. वाईट कितीही शक्तिशाली असले तरी शेवटी त्याचा नाश निश्चित आहे.
देवी दुर्गेने नऊ दिवस महिषासुर राक्षसाशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला आणि देवतांना स्वर्ग परत मिळवून दिला. म्हणूनच हा सण शक्तीच्या उपासनेचे आणि विजयाचे प्रतीक देखील मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)