फोटो सौजन्य: Gemini
2025 हे वर्ष भारतातील प्रवासी वाहन क्षेत्रासाठी एक उत्तम वर्ष ठरले. जीएसटी कपात आणि सणासुदीच्या हंगामातील मागणीमुळे कंपन्यांनी विक्रमी विक्री नोंदवली. मात्र, डिसेंबर २०२४ च्या तुलनेत कार निर्यात 9.36% कमी होऊन 69,100 युनिट्सवर आली, जी वर्षानुवर्षे 7,139 युनिट्सची घट आहे. मनोरंजक म्हणजे, एका कारने निर्यातीत लक्षणीय झेप घेतली, ही कार म्हणजे Nissan Magnite.
भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार
सब-4 मीटर SUV सेगमेंटमध्ये Nissan Magnite ही यादीत सर्वात पुढे राहिली असून जागतिक बाजारपेठेत तिची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. डिसेंबर 2025 मध्ये Magnite ची एकूण निर्यात 260.62% ने वाढून 9,268 युनिट्सवर पोहोचली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 2,570 युनिट्स इतकी होती. या यादीत Magnite चा वाटा 13.41% राहिला आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेली Magnite आफ्रिका, मिडल ईस्ट, लॅटिन अमेरिका आणि साउथईस्ट एशिया येथील सुमारे 65 देशांमध्ये निर्यात केली जाते. ही SUV LHD आणि RHD या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
भारतातील अनेक ऑटो कंपन्यांपैकी Maruti आणि Hyundai या चारचाकी सेगमेंटमधील सर्वात मोठ्या एक्सपोर्टर कंपन्या आहेत आणि या यादीत त्यांच्या सर्वाधिक मॉडेल्सचा समावेश आहे. निर्यातीत ग्राहकांची पसंती आता यूटिलिटी व्हेईकल्सकडे वाढताना दिसत आहे, मग ते सब-4 मीटर SUV असोत किंवा फुल-साइज SUV. सेडान कार्सच्या निर्यातीतही चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे.
Maruti अजूनही 36.8% मार्केट शेअर घेऊन नंबर 1 स्थानावर आहे, मात्र कंपनीच्या निर्यातीत मोठी घसरण झाल्याचे दिसले आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे Swift, Fronx आणि Baleno यांसारख्या जास्त विक्री होणाऱ्या मॉडेल्सची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे.






