Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटना पुन्हा समोर आल्याने शेतकरी व मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फवारणीदरम्यान तंबाखू किंवा खर्रा खाणे आणि सुरक्षेचे नियम डावलणे कसे जीवघेणे ठरू शकते आणि या धोक्यापासून वाचण्यासाठी नेमकी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 02, 2026 | 06:57 PM
Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन
Follow Us
Follow Us:
  • भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याच्या दोन नवीन घटना समोर आल्या आहेत.
  • फवारणीदरम्यान तंबाखू किंवा खर्रा खाल्ल्याने विषारी द्रव्ये शरीरात जलद गतीने पसरून विषबाधेचा धोका वाढतो.
  • जीवितहानी टाळण्यासाठी शेतकरी आणि मजुरांनी मास्कसह सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामात धान व इतर पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घडणाऱ्या अपघातांमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फवारणीच्या विषबाधेमुळे मागील दोन वर्षांत जिल्ह्यात एकही मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली नसली, तरी चालू हंगामात २ ऑगस्ट रोजी दोन शेतकऱ्यांना फवारणीमुळे विषबाधा झाल्याची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व मजुरांनी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

भात व इतर पिकांवर कीटकनाशक फवारणीचे काम सुरू असताना किंवा त्यादरम्यान तंबाखू, खर्रा खाणे मजूर व शेतकऱ्यांसाठी अत्यंत जीवघेणे ठरू शकते. तोंडावाटे निकोटीन व विषारी द्रव्ये शरीरात सहज प्रवेश करत असल्याने कीटकनाशकांचे विष अधिक वेगाने पसरते आणि विषबाधेची शक्यता कैक पटीने वाढते.

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

फवारणी करताना अनेक शेतकरी व मजूर सुरक्षिततेच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तोंडाला मास्क न लावणे, उघड्या अंगाने फवारणी करणे, हवेच्या दिशेविरुद्ध फवारणी करणे यामुळे विषारी घटक श्वासावाटे आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. तसेच फवारणीदरम्यान खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि योग्य खबरदारी न घेतल्यामुळे विषबाधेचा धोका बहुतांश पटीने वाढतो. विषबाधा झाल्यानंतर प्राथमिक उपचारास होणारा उशीर जीवघेणा ठरू शकतो.

मजुरांच्या उपचाराकडे दुर्लक्ष व प्रथमोपचार; अनेकदा शेतमजुरांना विषबाधेची प्राथमिक लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे विष संपूर्ण शरीरात पसरून परिस्थिती गंभीर बनते. त्यामुळे फवारणी करताना शेतात प्रथमोपचाराचे साहित्य सोबत ठेवणे आणि मजुरांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेणे अनिवार्य आहे.

Bhandara Crime: संतापजनक! 3 वर्षीय बालिकेला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेलं; आणि…, आज ‘भंडारा बंद’

फवारणी करताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. फवारणीच्या वेळी कोणतीही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्याकीय उपचार घेणे गरजेचे असून, उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास प्राणहानी होऊ शकते.

विषबाधेमुळे जर एखादी अनुचित घटना घडल्यास, अशा पीडित शेतकरी अथवा शेतमजुरांच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची व अनुदानाची प्रक्रिया अत्यंत किचकट असते. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी कृषी विभागाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे आणि फवारणी करताना पूर्ण काळजी घेणे प्रत्येक शेतकऱ्याच्या हिताचे आहे.

Web Title: Pesticide poisoning risk bhandara farmers safety guidelines auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
1

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
2

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता
3

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप
4

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.