फोटो सौजन्य: @deepaliranaa (X.com)
भारतात इलेक्ट्रिक कार्सना सुगीचे दिवस येत आहे. वाढत्या इंधनाच्या किमतीमळे ग्राहक देखील पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार्सना प्राधान्य देत आहे. ग्राहकांमध्ये असणारी हीच मागणी लक्षात घेत अनेक कार उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार रेंज असणाऱ्या कार ऑफर करत असतात. पर्मियम सेगमेंटमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या जातात. नुकतेच MG Motors ने भारतात नवीन इलेक्ट्रिक कार ऑफर केली आहे.
ब्रिटिश ऑटोमेकर एमजी मोटर्स भारतात अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. भारतीय बाजारात कंपनीने 21 जुलै 2025 रोजी लक्झरी इलेक्ट्रिक एमपीव्ही सेगमेंटमध्ये नवीन वाहन म्हणून एमजी एम9 लाँच केली आहे. या एमपीव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत? बॅटरी किती पॉवरफुल आहे? ही कार कोणत्या किंमतीत लाँच करण्यात आली आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
MG M9 इलेक्ट्रिक एमपीव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. प्रेसिडेंशियल लिमोझिनमधील सीट्समध्ये 16 वे ॲडजस्टमेंट, आठ मसाज ऑप्शन्स, व्हेंटिलेटेड आणि हीटेड, इंटेलिजेंट आर्म रेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, यात ब्राउन-सिल्व्हर-ब्लॅक कलर थीम इंटिरिअर आहे.
Kinetic Green आणि Tonino Lamborghini ने भारतात लाँच केली लक्झरी गोल्फ कार्ट, किंमत किती?
यासोबतच, यात सॉफ्ट टच डॅशबोर्ड, वेगवेगळे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम, अँबियंट लाइट्स, लेदरेट सीट्स, क्लायमेट कंट्रोल, दोन सिंगल पेन सनरूफ आणि पॅनोरॅमिक सनरूफ पर्याय, दुसऱ्या रांगेत दोन इन्फोटेनमेंट स्क्रीन आहेत.
याशिवाय, त्याच्या एक्सटिरिअर इलेक्ट्रिक स्लाइडिंग डोअर, एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, ट्रॅपेझॉइडल मेश फ्रंट ग्रिल, एलईडी टेल लाईट्स, 19 इंच अलॉय व्हील्स असे फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीने MG M9 मध्ये 90 kWh बॅटरी दिली आहे. जी एकदा चार्ज केल्यानंतर 548 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. त्यात बसवलेली मोटर याला 245 PS ची पॉवर आणि 350 न्यूटन मीटरचा टॉर्क देईल. त्याची बॅटरी 30 मिनिटांत 30 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.
MG M9 भारतीय बाजारात 69.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. एमपीव्हीची डिलिव्हरी 10 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल.
फक्त 15 हजार रुपयांचा असेल EMI ! Maruti Suzuki Ertiga साठी किती करावा लागेल डाउन पेमेंट?
MG M9 ही भारतात एक लक्झरी इलेक्ट्रिक MPV म्हणून सादर केली जाईल. जरी ही MPV कोणत्याही इलेक्ट्रिक MPV शी स्पर्धा करणार नाही. मात्र, Kia Carnival आणि Toyota Vellfire सारख्या लक्झरी ICE MPV कडून स्पर्धा मिळू शकते.