Kinetic Green आणि Tonino Lamborghini ने भारतात लाँच केली लक्झरी गोल्फ कार्ट, किंमत किती?
भारतात बजेट फ्रेंडली वाहनांसोबतच लक्झरी वाहनं देखील विकले जातात. लक्झरी वाहनं म्हंटल की त्यात फक्त कार किंवा बाईक येत नाही तर गोल्फ कोर्ट सुद्धा येते. गोल्फ हा नेहमीच श्रीमंत लोकांचा खेळ राहिला आहे. या खेळात Golf कार्ट आवर्जून वापरली जाते. नुकतेच, कायनेटिक ग्रीन आणि टोनिनो लॅम्बोर्गिनीने एक लक्झरी गोल्फ कार्ट लाँच केली आहे. यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? ही कोणत्या किंमतीत दिली जाते? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतातील कायनेटिक ग्रीन आणि इटलीची टोनिनो लॅम्बोर्गिनी यांनी देशात लक्झरी गोल्फ कार्ट लाँच केले आहेत. हे उत्पादन दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे बनवले आहे.
याला म्हणतात क्लास कार ! 668KM रेंज अन् 18 मिनिटात चार्ज, किंमत 2.07 कोटी
ही लक्झरी गोल्फ कार्ट इटलीमध्ये डिझाइन करण्यात आली असून भारतात तयार करण्यात आली आहे. हे वाहन मुख्यतः गोल्फ कोर्स, लक्झरी रिसॉर्ट्स, विमानतळ आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी वापरण्यात येणार आहे.
या लक्झरी कार्टमध्ये अनेक प्रगत आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार यात 2, 4, 6 आणि 8 आसनांच्या पर्यायांची निवड करता येते. यामध्ये इंटेलिजेंट डॅशबोर्ड, वायरलेस चार्जिंग सुविधा, एलईडी लाइट्स, हिल-होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, स्मार्ट स्टोरेज सोल्यूशन्स, फोल्डेबल विंडशील्ड यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. एका चार्जमध्ये ही कार्ट तब्बल 150 किमी अंतर पार करू शकते. यामध्ये बसवलेली मोटर 45 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते आणि 30 टक्क्यांपर्यंत ग्रेडिएंट सहज चढू शकते. ही कार्ट डाव्या हाताच्या ड्राइव्हसह सादर केली जाते, परंतु ग्राहकांना गरज असल्यास उजव्या हाताच्या ड्राइव्हमध्येही उपलब्ध आहे.
भारतात Maruti Suzuki eVitara केव्हा होणार लाँच? BE 6 आणि Creta Electric ला मिळणार जोरदार टक्कर
या कार्टचे उत्पादन सुरू करतानाच, कंपनीने आपल्या प्राथमिक लक्ष केंद्रित देशांची यादीही स्पष्ट केली आहे. सुरुवातीला ही लक्झरी कार्ट बहरीन, थायलंड, मालदीव आणि न्यूझीलंडमध्ये उपलब्ध केली जाईल. त्यानंतर ती युरोपियन देशांमध्ये विक्रीसाठी आणली जाणार आहे.
ही लक्झरी गोल्फ कार्ट दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आली आहे – जेनेसिस आणि प्रेस्टिज. जेनेसिस या बेस मॉडेलची सुरवातीची किंमत 10,000 अमेरिकन डॉलर्स ठेवण्यात आली आहे, तर प्रेस्टिज या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 14,000 अमेरिकन डॉलर्सपासून सुरू होते. भारतीय रुपयात या गोल्फ कार्टची किंमत 8 लाखांपासून सुरु होते आणि 12 लाखांपर्यंत जाते.