फोटो सौजन्य: @MasMasBiassaa (X.com)
भारतामध्ये अनेक लोकप्रिय कार्स आहेत, पण मारुती सुझुकी एर्टिगा यांनी ग्राहकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. खासकरून जॉइंट फॅमिलींसाठी ही कार पहिली पसंती ठरते. या कारमधील स्पेस, फीचर्स आणि परफॉर्मन्स यामुळे आजही एर्टिगा घराघरात पसंतीस उतरत आहे. विक्रीत देखील एर्टिगा कार आघाडीवर आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या कार्सना मोठी मागणी आहे. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एर्टिगामध्ये अलीकडेच स्टॅंडर्ड सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्जसह अपडेट करण्यात आले आहे. ही 7-सीटर कार उत्कृष्ट मायलेजसह येते. जर तुम्ही मारुती एर्टिगा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती पूर्ण पेमेंटवर खरेदी करणे गरजेचे नाही. तुम्ही डाउन पेमेंट आणि EMI वर देखील एर्टिगा खरेदी करू शकता.
याला म्हणतात क्लास कार ! 668KM रेंज अन् 18 मिनिटात चार्ज, किंमत 2.07 कोटी
मारुती एर्टिगाची सुरुवातीची किंमत 9 लाख 11 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत 10.15 लाख रुपये असेल, ज्यामध्ये आरटीओ चार्जेस आणि इंश्युरन्स रक्कम समाविष्ट आहे. जर तुम्हाला 6 एअरबॅग्जसह एर्टिगाचा बेस व्हेरिएंट खरेदी करायचा असेल तर त्यासाठी 2 लाख रुपये डाउन पेमेंट करणे योग्य ठरेल. यानंतर, उर्वरित 8.15 लाख रुपयांसाठी तुम्हाला बँकेकडून कार लोन घ्यावे लागेल. जर तुम्हाला ही रक्कम 5 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने मिळाली तर EMI फक्त 15 हजार रुपये असेल.
मारुती एर्टिगाचा सीएनजी व्हेरिएंट प्रति किलो सुमारे 26.11 किमी मायलेज देतो. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे इंजिन 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. मारुती सुझुकी एर्टिगाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ही कार बाजारात एक उत्तम एमपीव्ही मानली जाते. या 7 सीटर कारमध्ये 1462 सीसी पेट्रोल इंजिन आहे.
भारतात Maruti Suzuki eVitara केव्हा होणार लाँच? BE 6 आणि Creta Electric ला मिळणार जोरदार टक्कर
मारुती एर्टिगाचे इंजिन 101.64 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 136.8 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, त्याला मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देखील मिळतो. कंपनीच्या मते, ही कार प्रति लिटर 20.51 किमी मायलेज देखील देते.
मारुती एर्टिगात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्टसह 7-इंच टचस्क्रीन स्मार्टप्ले प्रो सिस्टम, 6-स्पीकर आर्कामिस सराउंड साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेसाठी रिअर एसी व्हेंट्स, उंची-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि दुसऱ्या रांगेतील रिक्लाइनिंग आणि स्लाइडिंग सीट यासारख्या फीचर्ससह येते.