इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला 'या' शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा, सौजन्य : सोशल मिडीया
इलेक्ट्रिक कार डीएनए आणि एचव्ही-टेक (HV-Tec) यांच्यासोबत भारतात अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोटरसायकल साकारणारी कंपनी रॅप्टी एचव्ही (Raptee.HV T 30)ने आपल्या ग्राहकांना मोटरसायकलची डिलेव्हरी सुरू केली आहे. कंपनीच्या बंगळुरूतील शोरुममधून ग्राहकांना मोटरसायकल देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. बंगळुरू शहर हे प्रीमियम आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलर्ससाठी देशातील महत्त्वाच्या बाजारांपैकी एक सिद्ध होत आहे.
डीएनए आणि एचव्ही-टेक हे नवनवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर ऑटो क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहेत. त्यांनी नवे तंत्र असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात आणली असून ग्राहकांची त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. त्याच अनुषंगाने कंपनीने नोव्हेंबरपर्यंत १०० पेक्षा जास्त मोटरसायकल विकण्याचे लक्ष्य ठरवले आहे. तसेच ग्राहकांच्या सुविधेसाठी त्यांनी बंगळुरूच्या एचएसआर लेआउटमध्ये एक डेडिकेटेड सर्व्हिस सेंटरही सुरू केले आहे.
याचमुळे रॅप्टी एचव्ही देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारावर आपली पकड बळकट करत आहे. तसेच ही इलेक्ट्रिक बाइक फुल चार्ज झाल्यानंतर २०० किलोमीटरच्या IDC रेंजचा दावा करते आणि तिचे रियल वर्ल्ड रेंज १५० किलोमीटरच्या जवळपास आहे. यात 22 kW चे इलेक्ट्रिक मोटर लावण्यात आले असून जो ७० न्यूटर मीटरचा पीक टार्क जेनरेट करतो. कंपनी रॅप्टी एचव्ही टी 30 च्या बॅटरी आणि मोटरसायकलवर ३ वर्षांची वॉरंटी देत आहे. आपण हिला कोणत्याही कार फास्ट चार्जिंग स्टेशनवर चार्ज करू शकता.
रॅप्टी एचव्हीचे सहसंस्थापक आणि सीईओ दिनेश अर्जुन याबाबत सांगतात की, बंगळुरू येथे गाड्यांची डिलेव्हरी सुरू करणे आमच्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे. बंगळुरूसह चेन्नईत १०० पेक्षा जास्त मोटरसायकल विकण्याचे ध्येय ठरवले आहे.
भारतीय बाजारपेठेत Raptee.HV T30 इलेक्ट्रिक मोटरसायकलची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही २.३९ लाख रुपये आहे. यातील वैशिष्ट्यांबाबत विचार करायचा झाला, तर ही भारताची अशी पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे, जी सीसीएस-२ (CCS2) कनेक्टरला सपोर्ट करते.






