फोटो सौजन्य सोशल मीडिया
‘Universo Ferrari’मध्ये Ferrariच्या सध्याच्या आणि खास मॉडेल्सची झलक पाहायला मिळणार आहे. 849 Testarossa, Purosangue, 12Cilindri, Amalfi Spider आणि F80 या कार प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण असतील. विशेष म्हणजे Ferrariची पहिली इलेक्ट्रिक कार Luce देखील येथे दाखवली जाणार आहे. त्यामुळे पारंपरिक V12 इंजिनपासून इलेक्ट्रिक तंत्रज्ञानापर्यंत Ferrariचा बदलता प्रवास चाहत्यांना जवळून पाहता येईल.
Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय
हे प्रदर्शन केवळ महागड्या कार पाहण्यापुरते मर्यादित नसणार आहे. येथे खास Racing Area तयार करण्यात येणार असून Ferrariच्या मोटरस्पोर्टमधील कामगिरी, रेसिंग टेक्नॉलॉजी आणि ऐतिहासिक रेसिंग कार्सची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच Classiche Area मध्ये Ferrariच्या ऐतिहासिक आणि आयकॉनिक मॉडेल्सचा वारसा अनुभवता येणार आहे.
Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
या प्रदर्शनातील सर्वात वेगळ्या आकर्षणांपैकी एक म्हणजे Ferrari Hypersail Ferrariचा हा अत्याधुनिक सेलिंग प्रोजेक्ट भारतातच नव्हे, तर आशियात पहिल्यांदाच प्रदर्शित केला जाणार आहे. 17 आणि 18 ऑक्टोबरला प्रदर्शनात निमंत्रित पाहुण्यांना प्रवेश असेल, तर 19 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी प्रदर्शन खुले होणार आहे. त्यामुळे Ferrariच्या कार्स, इतिहास, रेसिंग आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.






