फोटो सौजन्य: Pinterest
डुकाटीने त्यांची सर्वात खास आणि ट्रॅक-केंद्रित सुपरबाईक, Ducati Panigale V4 R भारतात लाँच केली आहे. डुकाटी चेन्नईने 1 जानेवारी 2026 रोजी भारतासाठी पहिली 2025 Panigale V4 R दिली होती, तर देशभरातील सर्व डुकाटी डीलरशिपवर बुकिंग आधीच सुरू झाली आहे.
तारीख ठरली! Tata Punch Facelift ‘या’ दिवशी लाँच होण्याची जास्त संभावना
Panigale V4 R ही सामान्य सुपरबाईक नाही. ही बाईक विशेषतः जागतिक सुपरबाईक चॅम्पियनशिपमध्ये रेसिंगसाठी डिझाइन करण्यात आली आहे. डुकाटीची आर सिरीजची सुरुवात 2001 मध्ये आयकॉनिक 996आर ने सुरू झाली आणि व्ही4 आर तीच परंपरा पुढे चालू ठेवते.
या सुपरबाईकमध्ये 998cc Desmosedici Stradale R V4 इंजिन देण्यात आले आहे, जे थेट Ducati Corse च्या MotoGP आणि WorldSBK प्रोग्राममधून विकसित करण्यात आलेले आहे. हे इंजिन तब्बल 218 hp पॉवर निर्माण करते आणि 6व्या गियरमध्ये 16,500 rpm पर्यंत पोहोचते.
यामध्ये ऑप्शनल रेसिंग एक्झॉस्ट बसवल्यास पॉवर 235 hp पर्यंत वाढते, तर Ducati Corse परफॉर्मन्स ऑइलसह ही पॉवर 239 hp पर्यंत पोहोचते. फुल रेसिंग ट्रिममध्ये Panigale V4 R ही बाइक 330 km/h पेक्षा जास्त स्पीड गाठू शकते.
इंजिनमध्ये हलके अॅल्युमिनियम पिस्टन, टायटॅनियम कनेक्टिंग रॉड्स, फोर्ज्ड स्टील क्रँकशाफ्ट, टायटॅनियम इनटेक व्हॉल्व्ह आणि 56 mm एवढे ओव्हल थ्रॉटल बॉडी यांसारखे हाय-एंड रेसिंग पार्ट्स देण्यात आले आहेत.
Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?
Ducati Panigale V4 R ची एक्स-शोरूम किंमत 84.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही सुपरबाईक फक्त Ducati Red रंगात उपलब्ध आहे. लिमिटेड उत्पादन आणि प्युअर रेसिंग डीएनएमुळे ही बाइक गंभीर कलेक्टर्स आणि ट्रॅक-केंद्रित रायडर्ससाठी एक अत्यंत खास मशीन ठरते.






