फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची एकतर्फी क्रेझ पाहायला मिळते. खासकरून, कित्येक तरुणांचे स्वप्न असते की त्यांच्याकडे रॉयल एन्फिल्डची बाईक असावी. कंपनीच्या अनेक बाईक मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. रॉयल एनफील्ड 350 च्या सर्वात लोकप्रिय बाईक्सबद्दल जेव्हा जेव्हा बोलले जाते तेव्हा Classic 350 चे नाव सर्वात वर येते. यासोबतच, ही सर्वाधिक विक्री होणारी बाईक देखील आहे. या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची ऑन-रोड किंमत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
जर तुम्ही रॉयल एनफील्ड क्लासिक 350 खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि एकदाच पूर्ण पैसे देण्याऐवजी कंपनीची ही बाईक EMI वर खरेदी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. चला जाणून घेऊया, या बाईकसाठी तुम्ही किती डाउन पेमेंट करणे गरजेचे आहे.
एकेकाळी मार्केट गाजवणारी बाईक अनुभवतेय विक्रीत दुष्काळ ! EV मॉडेलमुळे खेळच बिघडला
भारतीय बाजारात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे पाच व्हेरियंट उपलब्ध आहेत. बाईकचे सर्वात स्वस्त मॉडेल त्याचे हेरिटेज व्हर्जन आहे. दिल्लीमध्ये या मॉडेलची ऑन-रोड किंमत 2,28,526 रुपये आहे. देशातील इतर राज्यांमध्ये या किंमतीत काही फरक दिसून येतो. ही बाईक लोनवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2,17,100 रुपयांचे लोन मिळेल.
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे 11,500 रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. जर बाईकच्या लोनवर बँक 9 टक्के व्याज आकारते आणि जर तुम्ही हे लोन 2 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला दरमहा 10,675 रुपये EMI म्हणून जमा करावे लागतील. जर तुम्ही 3 वर्षांसाठी क्लासिक 350 साठी लोन घेतले तर तुम्हाला दरमहा 7,650 रुपयांचा हप्ता 9 टक्के व्याजदराने जमा करावा लागेल.
Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे. बाईकमध्ये बसवलेले हे 349 सीसी इंजिन 6,100 आरपीएमवर 20.2 बीएचपी पॉवर देते आणि 4,000 आरपीएमवर 27 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या इंजिनला इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टम जोडलेली आहे.
क्लासिक 350 मध्ये तुम्हाला 13 लिटरचे फ्युएल टॅंक दिली जाते. या बाईकचा मायलेज 41 किमी प्रति लिटर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या बाईकची टाकी भरली तर तुम्ही 500 किमी पर्यंत सहज प्रवास करू शकता. या बाईकची फ्युएल एफिशियन्सी, रस्त्याची परिस्थिती, रायडिंग स्टाईल आणि मेंटेनन्स यावर अवलंबून असते.